राज्याचं नवं गृहनिर्माण धोरण 2 सप्टेंबरला जाहीर होणार!
एबीपी माझा वेब टीम | 27 Aug 2016 03:01 PM (IST)
मुंबई : राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण येत्या 2 सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत घाटकोपरला जाहीर सभा होणार आहे. त्यावेळी नव्या गृहनिर्माण धोरणाची घोषणा केली जाणार आहे. राज्याचं नवं गृहनिर्माण धोरण कसं असावं यासंदर्भात 'मातोश्री'वर कालच (शुक्रवार) उद्धव ठाकरे, शिवसेना मंत्री आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीनंतरच गृहनिर्माण धोरणासंदर्भातला निर्णय घेण्यात आला.