SRA Fraud Mumbai मुंबई:मुंबईत मोठा एसआरए घोटाळा (SRA Fraud Mumbai) समोर आला आहे. प्रकल्पग्रस्तांसाठीच्या सदनिका नावावर करून देण्याच्या नावाखाली 47 जणांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांचे तत्कालीन आणि उबाठाचे आमदार संजय पोतनीस यांचे माजी पीए विश्वनाथ जाधव यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Continues below advertisement

2017 पासून 47 जणांची 5.57 कोटींची फसवणुक केल्याचा आरोप आहे. वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी तसेच कांदिवली येथील प्रकल्पग्रस्तांसाठी असलेल्या सदनिका नावावर करून देण्याचा बनाव करून फसवणूक करण्यात आली. एसआरएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचा बनाव करून गंडा घातला. 

विश्वनाथ जाधव याच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल- (SRA Fraud Mumbai)

एसआरएच्या प्रकल्पग्रस्तांसाठी असलेल्या सदनिकांच बनावट ताबा पत्रा, कलेक्टरचे तसेच एसआरएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची कथित सही आणि शिक्का असलेली बनावट लेटरहेड देऊन फसवणूक केली. विश्वनाथ जाधव याच्यासह शैलेश काकण, रुपेश बेल्हेकर आणि अभिषेक गुज्जर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Continues below advertisement

नेमकं प्रकरण काय? (SRA Fraud Mumbai)

मुंबईतील एसआरए (Slum Rehabilitation Authority) पुनर्विकास प्रकल्पातील कथित घोटाळ्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, पुनर्विकास प्रकल्पाशी संबंधित कागदपत्रांमध्ये बनावटपणा, आर्थिक गैरव्यवहार, विश्वासघात आणि फसवणूक केल्याचा आरोप आहे. गुंतवणुकीतील निधीचा गैरवापर करून एसआरए प्रकल्पातील व्यवहारांमध्ये अनियमितता करण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून संबंधित कागदपत्रांची पडताळणी, आर्थिक व्यवहारांची चौकशी आणि आरोपींची भूमिका तपासली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील नेमका घोटाळा आणि जबाबदार व्यक्तींबाबत अधिकृत चित्र स्पष्ट होणार आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO: