डोंबिवली: नववर्षाचे स्वागत करतांना नवनवीन सामाजिक संदेशही दिला जावा,  हा हेतू मनात ठेवून डोंबिवलीतील स्वाती जोशी यांनी सौरऊर्जेवर फिरणारी गुढी तयार केली आहे. सध्या कल्याण- डोंबिवलीमध्ये त्यांनी तयार केलेल्या गुढीची चांगलीच चर्चा आहे.

 

ही सोलार गुढी सोलार पॅनलच्या मदतीनं स्वतःभोवती फिरत असल्याममुळं ती सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते आहे. गुढीच्या माध्यमातून स्वाती जोशी यांना सोलार एनर्जीचा वापर वाढवण्याच्या संदेश दिला आहे.

 

गुढी ही नाविन्याचं प्रतिक मानलं जातं आणि सोलार पॅनलवर फिरणारी गुढी निर्माण करून स्वाती जोशी यांनी खऱ्या अर्थानं नाविन्याची गुढी उभारली आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

 

आजकाल दारासमोर उभ्या केल्या जाणाऱ्या मोठ्या गुढीबरोबरच कार, कार्यालयात टेबलावर ठेवता येईल अशा छोटय़ा आकाराच्या गुढ्या बाजारात येऊ लागल्या आहेत. अशा शोभिवंत गुढ्या भेटवस्तू म्हणून एकमेकांना देण्यात येऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर डोंबिवलीत भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हे व्यावसायिक असणाऱ्या स्वाती जोशी यांनी सौरऊर्जेवर स्वत:भोवती फिरणारी गुढी तयार केली आहे. सौर पॅनलद्वारे फिरणारी ही गुढी स्वत:भोवती फिरते.

 

ह्या गुढीचे वैशिष्ट म्हणजे हि गुढी घराबाहेर उन्हात ठेवल्यावर ती स्वत:भोवती फिरेलच, मात्र यात बसविलेल्या आणखी एका संयंत्रामुळे ती घरामध्ये ट्यूब अथवा एलईडी दिव्याच्या प्रकाशातही फिरू शकेल. या अनोख्या गुढीमुळे पारंपारिक उर्जेचे महत्व पटवून देण्यात मदतच होणार आहे.