मुंबई : खर्डी येथील वन अधिकारी दर्शन ठाकूर यांनी कल्याण तालुक्यातील खोणीफाटा येथे अवैधरित्या मांडुळाची विक्री करणाऱ्या एकाला अटक केली आहे. किरण सीताराम पवार हा भामटा काळ्या जादूसाठी या मांडुळाची दीड कोटी रुपयांना विक्री करणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानंतर वन विभागाने सापळा रचून किरण पवार या भामट्याला अटक केली आहे.
किरण पवार मांडूळ प्रजातीच्या दुर्मिळ सापाची विक्री करणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून पवारला पकडले. त्याच्याकडून 145 सेंटीमीटर लांब, अडीच किलो वजनाचा आणि तब्बल 1.5 कोटी रुपये किंतीचा मांडूळ हस्तगत केला आहे. पवारवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या कलम 9, 39, 39 (डी ), 48 (ए ), 49 (ए )आणि 51 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
कल्याणमध्ये दीड कोटी रुपयांचा मांडूळ जातीचा सर्प हस्तगत, विक्रेता गजाआड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Apr 2019 05:35 PM (IST)
खर्डी येथील वन अधिकारी दर्शन ठाकूर यांनी कल्याण तालुक्यातील खोणीफाटा येथे अवैधरित्या मांडुळाची विक्री करणाऱ्या एकाला अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून तब्बल दीड कोटी रुपयांचा मांडूळ ताब्यात घेतला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -