मुंबई : मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये आतापर्यंत पैसे, दागिने या स्वरुपात दान देण्याची सुविधा होती. मात्र आता शेअर्सच्या माध्यमातूनही दान देता येणार आहे.

 

सिद्धिविनायक देवस्थान देशातील श्रीमंत देवस्थानांपैकी एक मानलं जातं. या मंदिरात वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचं दान दिलं जातं. त्यामुळे आता देवस्थानाकडून दान करण्यासाठी थेट डी मॅट अकाऊंट सुरु करण्यात आलंय.

 
या डीमॅट अकाऊण्टद्वारे भाविक आता मंदिराच्या दानपेटीमध्ये रोख रक्कम टाकण्याऐवजी शेअर्सही दान करु शकणार आहेत. 'श्री सिद्धिविनायक गणपती टेंपल ट्रस्ट प्रभादेवी, मुंबई' या नावानं हे खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं उघडण्यात आलंय.