मुंबई : वृत्तपत्रामध्ये आणलेले वडापाव, भजीसारखे तेलकट पदार्थ जर खात असाल तर थोड थांबा. पेपरमध्ये गुंडाळून देण्यासाठी जुनी वृत्तपत्रे वापरली जातात. मात्र वृत्तपत्राच्या शाईतील विषारी घटक शरीरात जाऊन गंभीर आजार होण्याचा धोका वाढत आहे.
तेलकट खाद्यपदार्थ पेपरमध्ये गुंडाळून देण्यावर बंदी घालण्याची मागणी शिवसेनेचे नगरसेवक आशिष चेंबूरकर यांनी महापालिकेकडे केलेली आहे.
वर्तमानपत्रांच्या छपाईसाठी वापरण्यात येणाऱ्या शाईत ‘ग्राफाइट’ नावाचा अत्यंत विषारी घटक असतो. हा विषारी घटक कागदात गुंडाळलेल्या वडापाव, भजीसह इतर खाद्यपदार्थांत शोषून घेतला जातो. यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याला धोका संभवतो.
मुंबईत खाद्यपदार्थ वृत्तपत्राच्या कागदांमध्ये गुंडाळून विक्री न करता ती मिल्क पेपर किंवा टिशू पेपरच्या माध्यमातून करावी अशी मागणी सेनेचे नगरसेवक आशिष चेंबूरकर यांनी केली आहे.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
‘तेलकट खाद्यपदार्थ वृत्तपत्रात बांधून देण्यास बंदी घालावी’
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Oct 2017 09:25 PM (IST)
तेलकट खाद्यपदार्थ पेपरमध्ये गुंडाळून देण्यावर बंदी घालण्याची मागणी शिवसेनेचे नगरसेवक आशिष चेंबूरकर यांनी महापालिकेकडे केलेली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -