मुंबई : दक्षिण मुंबईतील लालबाब-परळमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. नाराज विद्यमान नगरसेवक नाना आंबोले यांनी शिवसेनेला रामराम करत भाजपची वाट धरली आहे.
शिवसैनिकांची बंडाळी मोडीत, किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी
नाना आंबोले यांचा वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाल्याने पत्नीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी ते आग्रही होते. मात्र स्थानिक आमदार अजय चौधरी यांच्याशी वाद असल्याने पत्नीला उमेदवारी मिळत नव्हती. अखेर नाराज नाना आंबोल यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
मी महापालिका निवडणूक लढवणार नाही : शुभा राऊळ
लालबाग परिसरात लोकप्रिय नगरसेवक म्हणून नाना आंबोलेंची ओळख आहे. आंबोले दोन टर्म शिवसेनेकडून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे आंबोले यांच्या भाजप प्रवेशामुळे लालबाग परळ परिसरात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर