काही दिवसांपूर्वीच शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली होती. मात्र काही महिलांचा यावर आक्षेप होता.
याबाबतचा जाब त्यांनी विभागप्रमुखांना विचारला. विभागप्रमुख राजेंद्र राऊत हे कार्यक्रमानिमित्त देवनार इथं आले होते. त्यावेळी त्यांच्याकडे महिलांनी विचारणा केली.
राजेंद्र राऊत मंचावरुन खाली आल्यानंतर, महिलांनी त्यांना घेराव घातला. त्याचवेळी एका महिलेने वादावादीत राजेंद्र राऊत यांच्या कानशिलात लगावली.
याप्रकारामुळे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेलं, मात्र दोन्ही बाजूंनी नमते घेत, पोलिसात तक्रार दिली नाही.