मुंबई : शिवसेनेच्या भात्यात आलेले 6 नगरसेवक मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात होते. आणि 6 नगरसेवकांच्या भाजपप्रवेशाची खलबतंही सुरु होती, या सर्व वावड्या असल्याचा दावा शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केला आहे. मनसेचं इंजिन खिळखिळ केल्यानंतर आज माझानं मास्टरस्ट्रोकचे मास्टरमाईंड अनिल परब यांच्याशी एक्स्लुझिव्ह संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. तसंच शिवसेनेचा मास्टऱस्ट्रोक हा उत्स्फूर्त होता. भाजपच्या दाव्याप्रमाणे दीड महिने आधीच तयारी सुरु होती, तर भाजपनं आम्हाला का रोखलं नाही? असा सवालही त्यांनी यावेळी केला. शिवसेनेच्या मास्टरस्ट्रोकबद्दल बोलताना अनिल परब म्हणाले की, “जे नगरसेवक शिवसेनेत आले, ते पूर्वाश्रमी शिवसैनिकच होते. त्यांच्या मनात शिवसेनेबद्दल प्रेम होतंच. भांडुपच्या पोटनिवडणुकीतील विजयानंतर भाजप खासदार किरीट सोमय्यांनी जो उन्माद दाखवला. त्यातून मनसे नगरसेवकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली." “मनसेच्या सहाही नगरसेवकांचं उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं. अन् याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी होती. त्यामुळे त्यांचं विलिनीकरण केलं आहे. अन् विलिनीकरणासाठी किरीट सोमय्यांचं वक्तव्य कारणीभूत ठरलं.” असंही त्यांनी यावेळी सांगितलं. अनिल परब यांची संपूर्ण मुलाखत पाहासंबंधित बातम्यामाफियांच्या पैशांवर शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी : किरीट सोमय्याघोडेबाजारी केल्याचा आरोप गाढवांनी करु नये : उद्धव ठाकरेपूर्वाश्रमीचे शिवसैनिक पुन्हा शिवसेनेत : अनिल परब7 नगरसेवक, 13 आमदार ते मनसेकडे उरलेला एकटा नगरसेवकपहिल्या मास्टरस्ट्रोकनंतर शिवसेनेची तात्काळ दुसरी खेळी!शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक, मनसेचे सहा नगरसेवक सेनेसोबतमनसेची साथ न सोडणारा एकमेव नगरसेवक कोण?मॉकड्रीलचं कारण देत मुंबई महापालिकेच सर्व दरवाजे बंद!करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोपदगाफटका योग्य नाही, नगरसेवकांवर राज ठाकरे भडकले‘लवकरच मुंबईत आमचा महापौर’, सोमय्यांचं शिवसेनेला आव्हानमोठे दावे करणार्‍यांचे पोट फाडून भाजपचा विजय : आशिष शेलारभांडुप पोटनिवडणुकीत भाजपचा विजय, सत्ता समीकरणं कशी बदलणार?मुंबई वॉर्ड क्रमांक 116 पोटनिवडणूक : भाजपच्या जागृती पाटील विजयीकरोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोपशिवसेनेला पश्चाताप, जागृती पाटील सेनेत येणार होत्या!फोडाफोडी आणि थैलीशाहीचे राजकारण नेहमीच यशस्वी होत नाही: शिवसेना