मुंबई : शिवसेना-भाजपमध्ये युती होणार की नाही, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. युतीसाठी भाजप नेते सातत्याने प्रयत्न करत आहेत. परंतु शिवसेना भाजपला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. युतीबाबत निर्णय घेण्यासाठी खासदार संजय राऊत यांनी भाजपला 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे.
युतीसाठी अल्टीमेटम देताना संजय राऊत म्हणाले की, "महाराष्ट्रात शिवसेना भाजपचा मोठा भाऊ असून आगामी निवडणुकीनंतर मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल," असे म्हणत राऊतांनी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, शिवसेनेकडून 1995 च्या फॉर्म्यूलावर जोर दिला जात आहे. विधानसभेच्या 150 जागा आणि मुख्यमंत्रीपदाची मागणी शिवसेनेने केली आहे. लोकसभेसाठी शिवसेनेकडून पालघर, भिवंडी, दिंडोरी, जळगावपैकी काही मतदारसंघांची मागणी केली आहे. तसेच लोकसभेसाठी 23/25 जागांबाबत चर्चा सुरु आहे. परंतु राज्यसभेची एक जागा द्यावी अशी मागणीदेखील शिवसेनेने केली आहे.
राज्यात शिवसेनाच मोठा भाऊ, पुढचा मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच : संजय राऊत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Feb 2019 05:58 PM (IST)
शिवसेना-भाजपमध्ये युती होणार की नाही, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. युतीसाठी भाजप नेते सातत्याने प्रयत्न करत आहेत. परंतु शिवसेना भाजपला घेरण्याचा प्रयत्न करत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -