शिवसेना भाजप युतीवर 'संक्रांती'चं सावट, चर्चा पुढं ढकलली
एबीपी माझा वेब टीम | 13 Jan 2017 04:41 PM (IST)
मुंबई: शिवसेना भाजपच्या युतीच्या चर्चा पुढील दोन दिवस तरी थांबली आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासून आज होणार, उद्या होणार असं म्हणता म्हणता युतीची चर्चा आणखी दोन दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. यावेळी शिवसेना भाजपच्या युतीच्या चर्चेवर संक्रातीचं सावट पडलं आहे. उद्या १४ जानेवारीला मकरसंक्रांत असल्यानं युतीची बोलणी टळली असून १५ जानेवारीनंतरच युतीवर चर्चा होईल अशी माहिती समोर येते आहे. दरम्यान, असं असलं तरीही आज मातोश्रीवर शिवसेना मंत्र्यांची मात्र बैठक पार पडली. या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मंत्र्यांची कानउघडणी केली असून त्यांना येत्या निवडणुकीत ग्रामीण भागात सभा घेण्याचे आदेश दिले आहेत.