मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेनं शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार यादी जाहीर केली नाही. उमेदवार यादी जाहीर केल्यास मोठ्या प्रमाणात बंडखोरी होऊ शकते. याचा विचार करत शिवसेनेनं उमेदवारांना परस्पर एबी फॉर्मचे वाटप केले होते.


काल उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. त्यानंतर आज शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, शिवसेनेतही मोठ्या प्रमाणात घराणेशाही दिसून आली आहे. तर दुसऱ्या पक्षातून आयात केलेल्या तब्बल 15 उमेदवारांना शिवसेनेकडून तिकीट देण्यात आलं आहे.

शिवसेनेतील घराणेशाही:

- माजी आमदार विनोद घोसाळकर यांची सून तेजस्विनी घोसाळकर यांना वॉर्ड क्र. 1 मधून उमेदवारी देण्यात आली आहे.

- खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांना वॉर्ड क्र. 144मधून उमेदवारी देण्यात आली आहे.

- आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकरांना वॉर्ड क्र. 194 मधून उमेदवारी देण्यात आली आहे.

- वॉर्ड क्र. 32 मधून गीता भंडारी आणि वॉर्ड क्र. 33 मधून अजित भंडारी यांना तिकीट देण्यात आलं आहे. दोघंही दीर, वहिनी आहेत.

















संबंधित बातम्या:

मुंबई महापालिकेसाठी मनसेची संपूर्ण यादी

मुंबई महापालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर