मुंबई : शिवसेना ठाकरे गट (Thackeray Group) आणि समाजवादी (Samajwadi Party) परिवाराची संयुक्त बैठक रविवार (15 ऑक्टोबर) रोजी पार पडली. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित होते. यावेळी त्यांनी या युतीविषयी भाष्य केलंय. तसेच त्यांना यावेळी महात्मा फुले यांची पगडी घालण्यात आली. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, 'महात्मा फुलेंची पगडी घालण्यासाठी तितकं मोठं डोकं लागतं, मी तितका मोठा नाही. त्यामुळे मी त्यांना म्हटलं की, ती माझ्या हातात द्या.  मी मुख्यमंत्री असताना लाडका होतो पण आता कोणीही मला लाडके माजी मुख्यमंत्री असं म्हणत नाही, अशी मिश्किल टीप्पणी देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.' 


'सत्ता नसताना सोबत येतात ते चिरकाल टिकतात'


'पोटनिवडणूक जिंकलो तेव्हा भाजपने हिंदुत्व म्हणून एकत्र आलो. पण सत्ता नसताना देखील जे एकत्र येतात ते चिरकाल टिकतात. मी आहे समाजवादी पक्षासोबत यामध्ये तुमच्या पोटात दुखण्याचा कारण काय. या पक्षामध्ये मुस्लिम देखील आहेत. पण ते देशावर प्रेम करणारे आहेत.' 'तुम्ही गुजरातमध्ये पाकिस्तानी संघावर फुलांचा वर्षाव करु शकता मग आम्ही समाजवादी पक्षासोबत आलो तर अडचण काय?' असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला.  'लढाई ही विचारांशी असते, माणसांशी नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.' 


संघ कुठे होता? - उद्धव ठाकरे


यावेळी भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांनी संघावर देखील निशाणा साधला. यावेळी बोलतना त्यांनी म्हटलं की, 'स्वातंत्र्याची चळवळ झाली तेव्हा, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली तेव्हा संघ कुठे होता असा सवाल उपस्थित केला. पण त्यावेळी जनसंघ होता. त्यावेळी जनसंघाने देखील संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सहभाग घेतला.' 


लोकांचा भ्रमनिरास झाला आहे - उद्धव ठाकरे 


मागे एका व्यक्तीने ज्या बोटाने भाजपला मत दिलं तेच बोट त्याने कापलं. कारण त्याचा भ्रमनिरास झाला. मी कोणच्या हातात माझ्या देशाचं भविष्य दिलं. त्यामुळे हा त्याचाच नाही तर संपूर्ण देशाचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे लोकांनी ठरवलं तर आपल्याला हा देश नक्की सुधारता येईल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 'त्यामुळे तुम्ही जर तेव्हा आणि आजही शिवसेनेसोबत उभे राहिला असता तर आज महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद केवढी झाली असती', असं उद्धव ठाकरे म्हणाले. 


'अत्रे आमच्यासाठी कायम मोठेच'


या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आमच्या घरात आम्हाला नेहमी आचार्य अत्रे हे मोठे आहेत, असंच सांगण्यात आलं. अत्रे आणि ठाकरे हा वाद सुरु होता, पण आमच्या घरात कधीही आम्हाला अत्रे वाईट असं सांगण्यात आलं नाही. 


हेही वाचा : 


Gopichand Padalkar : पवारांची नजर ज्यावर पडली त्याची माती झाली, जो मराठा समाजाचा झाला नाही तो तुमचा कसा होणार? गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका