मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची (Shiv Sena Dasara Melava 2023 ) तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde Dasara Melava) यांच्या दसरा मेळाव्यासाठी त्यांच्या गटाने कंबर कसली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटही इरेला पेटला आहे. ठाकरे गटाचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क (Shivaji Park) अर्थात शिवतीर्थवर (Shivtirth Dasara Melava) होणार आहे. तर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आझाद मैदान (Azad Maidan Dasara Melava) इथं नियोजित आहे.  दोन्ही गटाकडून त्यांच्या त्यांच्या दसरा मेळाव्याचा टिझर रिलीज (Dasara Melava teaser) करण्यात आले आहेत. त्यापुढे जात आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दसरा मेळाव्याच्या निमित्ताने नवे गाणेच लाँच (Shiv Sena new song) केलं आहे. 'पक्ष आपला ठाकरे' (Paksha Aapla Thackeray) अशा शब्दांनी या गाण्याची सुरुवात होते. 
 
पक्ष आपला ठाकरेss, चिन्ह आपलं ठाकरेsss 'दैवत आपलं ठाकरे', असे गाण्याचे बोल आहेत. शिवसेनेतील फूट, बाळासाहेबांचे विचार, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची वाटचाल याबाबत या गाण्यातून भाष्य केलं आहे.


"ठाकरे ह्या नावाची ताकदच अशी आहे की ते नाव पाठीशी असल्यावर जगातल्या कुठल्याही आव्हानाला तोंड द्यायची शक्ती निष्ठावंत शिवसैनिकांच्या मनगटात येते. कधीही न आटणारा उर्जेचा आणि मायेचा स्रोत म्हणजेच तमाम निष्ठावान शिवसैनिकांचं दैवत 'ठाकरे'! ह्याच दैवतावरच्या प्रेमापोटी शिवसैनिकांनी अर्पण केलेलं हे नवीन गीत..'दैवत आपलं ठाकरे'!, असं शिवसेना ठाकरे गटाने म्हटलं आहे. 


VIDEO : ठाकरे गटाचे नवं गाणे (Thackeray Group Shiv Sena New Song)



दसरा मेळाव्यासाठी शिवसेना ठाकरे गटाची नेमकी कशी तयारी?


 शिवसेना ठाकरे गटाकडून शिवतीर्थावर येणाऱ्या हजारो शिवसैनिकांसाठी विशेष नियोजन करण्यात आलं आहे. नियोजनाची जबाबदारी ठाकरे गटाचे राज्यातील संपर्कप्रमुख जिल्हाप्रमुख आणि मुंबईतील विभाग प्रमुख यांना देण्यात आली आहे.


अधिकाधिक शिवसैनिकांनी रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रेल्वेने दसरा मेळाव्याला येण्याचं आवाहन ठाकरे गटाकडून करण्यात आलं आहे


राज्यभरातील तळागाळातील शिवसैनिकांनी दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर येण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्यांना शिवतीर्थापर्यंत आणण्यासाठी सहकार्य करण्याची जबाबदारी त्या त्या जिल्ह्यातील संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांना देण्यात आली आहे.


धाराशिव ते दादर (Dharashiv to Dadar) ही तुळजाभवानी विशेष एक्सप्रेस रेल्वे शिवसैनिकांना घेऊन दादरला येईल त्यासोबतच कोल्हापूर आणि कोकणातून सुद्धा मोठ्या संख्येने रेल्वेने शिवसैनिक दसऱ्याला सकाळी मुंबईत पोहोचतील. 


शिवतीर्थावर येणाऱ्या शिवसैनिक व इतर मान्यवरांना शिवाजी पार्क येथे जाण्यास सोयीचे व्हावे याकरिता स्थानिक पोलीस व वाहतूक यंत्रणा नियंत्रित करणाऱ्या पोलिसांना वाहतुकीचे आणि गर्दीचे योग्य नियंत्रण करण्यासाठी सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत


जेवणाचे डबे आणि बॅगा घेऊन येऊ नका, शिवसैनिकांना आवाहन करण्यात आलं आहे. मेळाव्यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मेळाव्याला येताना जेवणाचे डबे, बॅगा अथवा कोणतीही वस्तू घेऊन मैदानात येऊ नये, असे नमूद करण्यात आले आहे


ठाकरे गटाकडून पार्किंगपासून ते शिवतीर्थ यासाठी विशेष पिकप ड्रॉपची सोय करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहन उभी करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे


वाहने उभी करण्याची व्यवस्था खालीलप्रमाणे



  • बसेस, टेम्पो, ट्रॅव्हलर्स, मोठे टेम्पो -

  • संपूर्ण सेनापती बापट मार्ग, दादर

  • कामगार मैदान, सेनापती बापट मार्ग ॥ माहीम कॉजवे ते माहीम जंक्शन

  • पाच गार्डन, माटुंगा

  • एडनवाला रोड, , माटुंगा

  • नाथालाल पारेख, माटुंगा

  • आर. ए. के. रोड, वडाळा

  • चारचाकी हलकी वाहने

  • इंडिया बुल इंटरनॅशनल सेंटर, सेनापती बापट मार्ग, दादर

  • इंडिया बुल्स १ सेंटर, ज्युपिटर मिल कंपाऊंड, एलफिन्स्टन, सेनापती बापट मार्ग, दादर

  • कोहिनूर वाहनतळ, जे. के. सावंत मार्ग, शिवाजी पार्क 


संबंधित बातम्या


Shinde Group Dasara Melawa : शिंदे गटाचा आझाद मैदानावर दसरा मेळावा, जय्यत तयारीला सुरुवात


Thackeray Group Dasara Melawa : शिवतिर्थावर ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी