मुंबई : राजकारणी लोक एकमेकांवर टीका करण्यासाठी नेहमीच सोशल मीडियाचा आधार घेतात. यात शेर, मालिका, चित्रपटातील संवाद ते सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ, मिम्सचा वापर करताना दिसतात. सध्या अशाच एका व्हिडीओचा वापर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी केला आहे.

सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होत आहे. यात ती काही तरुणांना तिच्या कामाचे 1800 रुपये मागत आहे. ते तरुण तिला 1800 रुपये दिला असल्याचे जीव तोडून सांगत आहे. मात्र, तरीही ती महिला ऐकायला तयार दिसत नाही. सदर तरुणांनी महिलेला पाचशे रुपयांच्या तीन नोट आणि दोनशे रुपयाची एक नोट आणि शंभरची एक नोट, असे अठराशे रुपये दिलेत. महिलेला सुद्धा हे मान्य आहे. ती म्हणते की तुम्ही मला 500 च्या तीन नोटा दिल्यात हे मला मान्य आहे. पुढे ती म्हणते की तुम्ही मला दीड हजार आणि तीनशे रुपये दिलेत. मात्र, मला माझे अठराशे रुपये हवे आहे. त्यावर त्या तरुणांना काय करावं कळेना.

प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात उद्या पंढरपुरात आंदोलन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या आंदोलनामुळे प्रशासन अलर्ट

अशाही परिस्थितीत हे तरुण अगजी शांतपणे महिलेला सांगतायेत की, हे सर्व नोटा मिळून 1800 रुपये होतात. तरीही ती महिला ऐकून घ्यायला तयार नाही. त्यावर ते म्हणतात की आता काय अठराशेची नोट बनवू का? हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर वेगवेगळे मिम्स देखील व्हायरल झाले आहेत.

व्हिडीओचा विरोधकांवर टीका करण्यासाठी वापर

महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी हा व्हिडीओ ट्वीटर वर शेअर घसरलेल्या जीडीपी वर निशाणा साधला आहे. "निर्मला काकू, अर्थतज्ञांशी जीडीपी ठरवण्याच्या पद्धतीबाबत चर्चा करताना.." असं लिहित अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केलीय.

हाच ट्वीट रिट्वीट करत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राज्यातील विरोधपक्षांवर टीका केलीय. मात्र, हे ट्वीट केंद्राशी संबंधीत नसून परीक्षेला धरुन आहे. "सत्यजीतजी, परीक्षा घेऊ नयेत हे काहींना समजून सांगता सांगता देखील अशीच काहीशी स्थिती होती."

University Exams | केंद्र सरकार म्हणतंय शाळा काॅलेज बंद मग परीक्षांचा आग्रह का? मंत्री उदय सामंत यांचा सवाल