मुंबई : महाराष्ट्रातील महायुती सरकारनं मराठा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सारथी संस्थेनं परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये बदल केले आहेत. शिष्यवृत्तीच्या लाभांवरील रकमेची मर्यादा संपुष्टात आणली गेली आहे. सारथीच्या या निर्णयानं मराठा कुणबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Continues below advertisement

सारथीकडून परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. नव्या निर्णयानुसार शिष्यवृत्तीच्या लाभांवरील रकमेची मर्यादा संपुष्टात आणण्यात आली आहे. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मराठा आणि मराठा कुणबी विद्यार्थ्यांना या निर्णयामुळं दिलासा मिळणार आहे.  

परदेशातील शैक्षणिक संस्थेचे संपूर्ण शिक्षण शुल्क आता संबंधित यंत्रणेमार्फत थेट संस्थेला देण्यात येणार आहे.  विद्यार्थ्यांना पुस्तके, स्टेशनरी, प्रबंध तयार करणे, स्थानिक प्रवासासह इतर खर्चांसाठी दरवर्षी अमेरिका व इतर देशांसाठी 1500 अमेरिकन डॉलर (यु.के. वगळून) आणि यु.के.साठी 1100 पौंड इतका निर्वाह भत्ता/मंजूर करण्यात आला आहे. 

Continues below advertisement

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता यादीसाठी आता क्यूएस रँकिंग विचारात घेतली जाणार आहे.  दोन किंवा अधिक विद्यार्थ्यांचे विद्यापीठ रँकिंग समान असल्यास, त्यांच्या मागील पदवी परीक्षेतील गुणांना प्राधान्य दिले जाणार आहे. 

सारथीनं परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजने संदर्भात महाराष्ट्राच्या नियोजन विभागाकडे मार्गदर्शन मागितलं होतं. त्या संदर्भात नियोजन विभागानं सारथीला पत्र लिहून बदलांबाबत कळवलं आहे. 

दरम्यान, राज्य सरकार आणि सारथीनं केलेल्या बदलांमुळं परदेशात शिक्षण घेणाऱ्या मराठा, मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना यामुळं दिलासा मिळणार आहे. मराठा समाजाच्या प्रश्नांसंदर्भात राज्य सरकारनं आणखी एक सकारात्मक पाऊल टाकल्याचं बोललं जातंय.