एक्स्प्लोर

Metro Slab Collapsed: उत्तर प्रदेशातील सरपंच; नातेवाईकाच्या लग्नासाठी अन् फिरण्यासाठी मुंबईत आले, मुलुंड परिसरातून जात असतानाच मेट्रो पिलरचा सिमेंट ब्लॉक कोसळला, दुर्दैवी घटनेनं हळहळ

Metro Slab Collapsed: दुर्घटनेत ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या तीन ते चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. रिक्षातील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई:  मुंबईतील मुलुंड (पश्चिम) परिसरात आज शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान गंभीर अपघात घडला. एलबीएस रोड LBS Road वरील बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा एक भाग अचानक तुटून (Mumbai Accident Metro Slab Collapsed) खाली पडला. हा तुकडा रस्त्यावरून जात असलेल्या ऑटो रिक्षा आणि एका कारवर कोसळला. ही घटना जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ घडली. प्राथमिक माहितीनुसार, दुपारी सुमारे १२.२० वाजता या अपघाताची माहिती संबंधित यंत्रणांना मिळाली. या दुर्घटनेत ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या तीन ते चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. रिक्षातील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

तर या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षा मधील फॅमिली उत्तर प्रदेशवरून आली होती, लग्नासाठी जात असताना अपघात झाला आहे. या भीषण घटनेत रिक्षातील एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मयत रिक्षातील सरपंचाची बॉडी शवविच्छेदन करण्यासाठी मुलुंडमधील उपासनी हॉस्पिटल मधून घाटकोपर राजावाडीसाठी घेऊन जात आहे. मुंबईच्या रितू तावडे महापौर आणि उपमहापौर संजय घाडी मुलुंड मधील उपासनी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. याच हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार सुरू आहे.

मुलुंड मध्ये मेट्रोच्या स्लॅब कोसळून मृत्यू झालेले रामधन यादव हे उत्तर प्रदेश राज्यातील एका गावचे सरपंच असल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या जौनपुर जिल्हा मधून सरपंच रामधन यादव आणि माजी सरपंच महेंद्र यादव मुंबईत फिरण्यासाठी आले होते. मुलुंड परिसरात या सरपंच यादव यांच्या मित्राचे दुकान आहे. याच दुकानांमधून कळवामध्ये एका नातेवाईक यांच्या घरी लग्नासाठी सरपंच आणि माजी सरपंच त्यासोबत रिक्षावाला निघाले होते. मात्र दुपारी साडेबाराच्या सुमारास मेट्रोच्या सिमेंट ब्लॉक कोसळून सरपंच रामधन यादव यांच्या दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

यानंतर घटनेची माहिती मिळताच यादव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सरपंच मुंबईत फिरण्यासाठी आले होते, मात्र या मेट्रोच्या सिमेंट ब्लॉक रिक्षावर कोसळल्यामुळे त्यांच्या दुर्दैवी मृत्यू झाली आहे. नातेवाईकांकडून या घटनेमध्ये जे जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली जात आहे. खरंतर सरपंच रामधन यादव आणि माजी सरपंच मुंबई फिरून दोन दिवसात गावी उत्तर प्रदेश राज्यातील जौनपुर जिल्ह्यात जाणार होते, मात्र त्यापूर्वी ही दुर्दैवी घटना घडली आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला

मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

मुंबईतील मुलुंड भागात मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून इतर काही जखमी झाले आहेत. या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले असून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृताच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार देईल आणि जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

उपमहापौर संजय घाडींनी दिली माहिती

उपमहापौर संजय घाडी या घटनेवरती बोलताना म्हणाले की, मुलुंड परिसरात मेट्रोचे काम सुरू असताना दुपारी साडेबाराच्या सुमारास सिमेंटच्या स्लॅब कोसळलाय सिमेंटच्या स्लॅब रिक्षा आणि कारवर कोसळला. रिक्षा चालक प्रवाशांना कळवाला नातेवाईकाच्या लग्नासाठी सहकुटुंब जात होता. त्यासोबत महिला कार चालवत लहान मुलांसाठी सामान घेण्यासाठी जात होती. या स्लॅब कोसळल्यामुळे कारचालक महिला आणि रिक्षा चालक सोबत दोन जण अजून अशी एकूण चार जण जखमी झाले आहेत. जखमी पैकी रिक्षा चालकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाली आहे. संपूर्ण घटनेचा आढावा घेतला आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या संदर्भात माहिती दिली आहे. या घटनेमध्ये मेट्रोचे जे कोणी अधिकारी कर्मचारी दोषी ठरतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार अशा इशारा देखील उपमहापौर संजय घाडी यांनी दिला आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबईतील मुलुंड (पश्चिम) परिसरात आज शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान गंभीर अपघात घडला. एलबीएस रोड LBS Road वरील बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा एक भाग अचानक तुटून (Mumbai Accident Metro Slab Collapsed) खाली पडला. हा तुकडा रस्त्यावरून जात असलेल्या ऑटो रिक्षा आणि एका कारवर कोसळला. ही घटना जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ घडली. प्राथमिक माहितीनुसार, दुपारी सुमारे १२.२० वाजता या अपघाताची माहिती संबंधित यंत्रणांना मिळाली. या दुर्घटनेत ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या तीन ते चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एकाचा मृत्यू झाला आहे(Mumbai Accident Metro Slab Collapsed) महापौर रितू तावडे मुलुंड घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

 उपासनी रुग्णालयाकडून माहिती मिळाली: ४ जखमींची नोंद झाली त्यापैकी १ मृत, 
नाव-
१) रामधन यादव, मृत 
२) राजकुमार इंद्रजीत यादव, वय ४५, आयसीयूमध्ये दाखल, प्रकृती गंभीर
३) महेंद्र प्रताप यादव, वय ५२, दाखल, प्रकृती स्थिर
४) दीपा रुहिया, वय ४०, दाखल, प्रकृती स्थिर

रामधन यादव याचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात आणण्यापूर्वीच रामधन यांचा मृत्यू झाला होता. राजकुमार इंद्रजित यादव (वय 45), महेंद्र प्रताप यादव (वय 52), दिपा रुहिया (वय 40) हे तिघे जखमी आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मिस्टर प्रफुल पटेलजी, रोहित पवारांनी थेट नाव घेऊनच दिलं चॅलेंज; VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाचं लग्नच काढलं
मिस्टर प्रफुल पटेलजी, रोहित पवारांनी थेट नाव घेऊनच दिलं चॅलेंज; VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाचं लग्नच काढलं
Pune Petrol Diesel gas shortage: घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले, हॉटेल व्यवसायिकांना सिलेंडर मिळेना; स्मशानभूमीतही विद्युतदाहिनी बंद
घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले, हॉटेल व्यवसायिकांना सिलेंडर मिळेना; स्मशानभूमीतही विद्युतदाहिनी बंद
'आप'ण संसदेत आवाज उठवावा, अजित पवारांच्या अपघात चौकशीबाबत रोहित पवार दिल्लीत; अरविंद केजरीवालांशी चर्चा
'आप'ण संसदेत आवाज उठवावा, अजित पवारांच्या अपघात चौकशीबाबत रोहित पवार दिल्लीत; अरविंद केजरीवालांशी चर्चा
Mumbai Feriwala attack on BMC workers: मुंबईत फेरीवाल्यांचा BMC अधिकाऱ्यांवर हल्ला, पळवून पळवून मारलं, कांदिवलीत धडकी भरवणारं दृश्य
मुंबईत फेरीवाल्यांचा BMC अधिकाऱ्यांवर हल्ला, पळवून पळवून मारलं, कांदिवलीत धडकी भरवणारं दृश्य
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Embed widget