मुंबई: मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि काँग्रेसचे माजी खासदार गुरुदास कामत यांच्यातील वाद काही संपण्याचं नाव घेत नाही.
कारण भुपेंद्र हुडांच्या मध्यस्थीनं दोन्ही नेत्यांनी जुहूच्या हॉटेलमध्ये भेट घेतली..मात्र दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी जोरदार बाचाबाची झाली. शाब्दिक बाचाबाचीमुळे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरासमोर भिडले.
BMC साठी काँग्रेसच्या पहिल्या यादीला हायकमांडची स्थगिती
दरम्यान, मुंबई काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या वाद आणि गटबाजीमुळे, महापालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या पहिल्या यादीला स्थगिती देण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 115 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. मात्र, या यादीत संजय निरुपम यांच्या गटातील उमेदवारांचाच वरचष्मा असल्याची आणि इतर उमेदवारांना डावलण्यात आल्याची टीका झाली.
सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई काँग्रेसमधले अंतर्गत वाद आणि संजय निरुपम यांना होणारा विरोध लक्षात घेता पहिल्या यादीला स्थगिती देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.
संबंधित बातमी
BMC साठी काँग्रेसच्या पहिल्या यादीला हायकमांडची स्थगिती