एक्स्प्लोर

संदीप देशपांडे मनसे प्रवक्ते, जे बोलतात ती शिंदे गटाची की भाजपची भूमिका? वारंवार तुम्ही टीका का करता?? रुसवे फुगवे असेल तर दोन ठाकरे बंधू बोलतील; ठाकरेंच्या नेत्याचा खोचक टोला

संदीप देशपांडे हे मनसेचे प्रवक्ते असताना ते त्या पद्धतीने बोलतात ते शिवसेना शिंदे गटाची भूमिका मांडतात की भाजपची भूमिका मांडतात? असा खोचक सवाल अखिल चित्रे यांनी केला.

Akhil Chitre on Sandeep Deshpande: चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धनोरकर यांच्या वादामध्ये काँग्रेसला महानगरपालिकेमधील आलेली सत्ता गमवावी लागली. तब्बल 27 नगरसेवक निवडून आणूनही काँग्रेस सत्तेपासून दूर राहिला. त्यामुळे भाजपचा महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाचा उपमहापौर झाल्याने राजकीय चर्चा रंगली आहे. शिवसेना ठाकरे गटावर या संदर्भात होत असलेल्या टीकेला खासदार संजय राऊत यांच्याकडून उत्तर दिला जात असतानाच आज थेट मनसे प्रवक्ते देशपांडे यांनी विश्व प्रवक्ते म्हणत अचानक राऊत यांच्यावर टीका केली. त्यामुळे संदीप देशपांडे यांनी घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली आहे. देशपांडे यांनी केलेल्या टीकेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते अखिल चित्रे यांनी देशपांडे यांना टोला लगावला आहे. 

शिंदे गटाची भूमिका मांडतात की भाजपची भूमिका मांडतात?

संदीप देशपांडे हे मनसेचे प्रवक्ते असताना ते त्या पद्धतीने बोलतात ते शिवसेना शिंदे गटाची भूमिका मांडतात की भाजपची भूमिका मांडतात? असा खोचक सवाल अखिल चित्रे यांनी केला. संदीप देशपांडे यांना मुंबईत बसून चंद्रपूरमध्ये काय चाललय कसं कळतं मला माहित नसल्याचाही टोला त्यांनी लगावला. ते म्हणाले की रुसवे फुगवे असतील, तर दोन ठाकरे बंधू आपापसात बोलतील. ठाकरे बंधूंची युती आहे त्यामुळे काही गोष्टी पाळाव्यात. वारंवार तुम्ही टीका का करताय? अशी विचारणा त्यांनी केली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मनसे आणि शिवसेना एकत्र लढली होती. चंद्रपूरमध्ये आम्ही मनसेसोबत लढलो नव्हतो याकडे चित्रे यांनी लक्ष वेधलं. संदीप देशपांडे जे बोलत आहेत ते कोणाला फायदा करू इच्छित आहेत? अशी विचारणाही त्यांनी केली. 

राजकीय स्वार्थासाठी हिंदुत्व तुम्ही शिकवू नये

दरम्यान, परभणीमध्ये मुस्लिम महापूर करण्यावरूनही अखिल चित्रे यांनी प्रतिक्रिया दिली. मातृसंस्थेच्या कार्यक्रमासाठी सलमान खानला बोलवतात ते मुसलमान त्यांना चालतात, पाकिस्तानी वंशाचा अदनान सामी चालतो तेव्हा तुमचे हिंदुत्व कुठे गेलं? राजकीय स्वार्थासाठी हिंदुत्व तुम्ही शिकवू नये, अशी टीका त्यांनी केली. शिवसेनेमध्ये साबिर शेख मंत्री होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा बोलले. जो महापौर झाला होता तो वीस वर्ष सुद्धा ते याच पक्षाचेा तालुका अध्यक्ष होता, असे ते म्हणाले. तुम्हाला एवढी चीड मुसलमानांबद्दल आहे तर तुमच्या भाजपच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढून टाका. टिल्लू नेत्यांमध्ये जर हिम्मत असेल तर त्यांनी सांगावं की हिरवा रंग काढून टाका, असा टोलाही त्यांनी लगावला. 

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
Gairan Land : मनपा-नगरपालिका क्षेत्रातील हजारो हेक्टरवरील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवले, कोट्यवधींची जमीन सार्वजनिक वापरासाठी मोकळी 
मनपा-नगरपालिका क्षेत्रातील हजारो हेक्टरवरील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवले, कोट्यवधींची जमीन सार्वजनिक वापरासाठी मोकळी 
Mumbai Bike Taxi : मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते, राष्ट्रवादीच्या आमदारांचं रोहित पवारांना उत्तर; महाराष्ट्राचा 'पप्पू' म्हणत पाटलांची टीका
प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते, राष्ट्रवादीच्या आमदारांचं रोहित पवारांना उत्तर; महाराष्ट्राचा 'पप्पू' म्हणत पाटलांची टीका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
Share Market Crash : युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
Embed widget