Devendra Fadnavis : आज विधानसभेत (Maharashtra Assembly Session) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नवा पेनड्राईव्ह बॉम्ब सादर केला. यात एक ऑडिओ असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. यातील डॉ. मुद्दस्सिर लांबे (Dr. Muddasir Lambe) यांचे संबंध दाऊदशी असून डॉ. मुद्दस्सिर लांबे आणि अर्शद खान (Arshad Khan) यांच्यातील संभाषणाचा हा ऑडिओ असल्याचं त्यांनी सांगितलं. डॉ लांबे यांना राज्य सरकारने (State Government) वक्फ बोर्ड (Waff Board) वरती घेतले आहे. मात्र एका सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेने त्यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार केली आहे, असंही फडणवीस म्हणाले. 


मात्र फडणवीसांच्या या दाव्याचं खंडण करत मंत्री नबाव मलिक यांच्या कन्या सना मलिक शेख यांनी डॉ. मुद्दस्सिर लांबे यांची वक्फ बोर्डावर नियुक्ती मलिकांच्या काळात झाली असल्याचा मुद्दा खोडून काढला आहे. सना मलिक शेख यांनी डॉ. मुद्दस्सिर लांबे यांच्यासह फडणवीसांचा फोटो ट्वीट केला आहे. सोबतच म्हटलं आहे की, फडणवीसांनी सांगितलेलं अर्धसत्य हे पूर्ण खोटं आहे.  डॉ. लांबे यांची 13 सप्टेंबर 2019 रोजी फडणवीस/भाजप सरकारने वक्फ बोर्ड सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. महाविकास आघाडी सरकारची स्थापना नोव्हेंबर 2019 मध्ये झाली. माझ्या वडिलांना जानेवारी 2020 च्या पहिल्या आठवड्यात अल्पसंख्याक/वक्फ विभाग मिळाला. देवेंद्र फडणवीस डी-गँग नातेवाईक आणि बलात्काराच्या आरोपीसह असं त्यांनी म्हटलं आहे. 






फडणवीसांनी आज दाऊदशी संबधित एक संवादाचा पेनड्राईव्ह देखील विधानसभेत सादर केला आणि तो संवाद देखील उपस्थिती सर्वांना वाचून दाखवला. फडणवीस म्हणाले, या पेनड्राईव्हमधील संभाषणात दोन पात्र आहेत. त्यापैकी एक आहे मोहम्मद अर्शद खान आणि दुसरे म्हणजे ज्यांना  अल्पसंख्याक मंत्र्यांनी वक्फ बोर्डावर सदस्य म्हणून घेतलं आहे असे डॉ. मुद्दसीर लांबे. 31 डिसेंबर 2020 रोजी डॉ.लांबे यांच्याविरोधात एका सामाजिक कार्यकर्तीने बलात्काराची तक्रार दाखल केली होती, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.