मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ट्वेन्टी ट्वेन्टी मुंबई लीगच्या ब्रॅण्ड अॅम्बॅसेडरपदाची धुरा सचिन तेंडुलकरनं स्वीकारली आहे. मुंबईत आयोजित एका सोहळ्यात सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.


मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न खेळाडूंसाठी आयपीएलच्या धर्तीवर ट्वेन्टी ट्वेन्टी मुंबई लीगचं आयोजन करण्यात आलं आहे. या लीगचे सामने 11 ते 20 मार्च या कालावधीत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येतील.

मुंबई क्रिकेटमधल्या स्थानिक स्पर्धांचा ढाचा हा भारतीय क्रिकेटमध्ये मजबूत मानला जातो. पण सदर स्पर्धांमधून खेळाडूंना आर्थिक लाभ होत नाही. आगामी ट्वेन्टी ट्वेन्टी मुंबई लीगमधून खेळाडूंना थेट आर्थिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न होणार आहे. सचिन तेंडुलकरनंही त्या प्रयत्नांचं कौतुक केलं.