ठाणे: सरकारने जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बंद करुन तीन महिने पूर्ण झाले, तरीही नोटा बदलण्यासाठी ठाण्यात तब्बल 30 लाखाच्या बाद ठरलेल्या नोटा घेऊन आलेल्या सुनील यादव (27) तरुणाला ठाणे गुन्हे अन्वेषण युनिट-5 च्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून हजार आणि पाचशे रुपयांच्या 29 लाख 97 हजार 500 रुपयाच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत.

मुंबईच्या सांताक्रूझ, चक्कीखान परिसरातील दीप नारायण शुक्ला चाळीत राहणारा सुनील यादव कमिशनवर जुन्या नोटा बदलीचे काम करीत होता. नोटा बदलण्यासाठी तो ठाण्यात येत असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण युनिटला मिळाली. यानंतर पोलिसांनी तीन हात नाका येथे सापळा रचून सुनील यादव याला अटक केली.

यावेळी त्याच्याकडून  पाचशे आणि हजाराचे नोटांचे बंडल आढळले. आरोपी सुनील यादव याला अटक करण्यात आली. अन पोलीस पथकाच्या  जाळ्यात अडकला. अटक यादव याची चौकशी सुरु असून या नोटा कुठून आणल्या, कुणाला द्यायच्या होत्या आणि कुणी दिल्या होत्या याची चौकशी करीत आहेत.