एक्स्प्लोर

Ritu Tawade: रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौर, भाजप-शिवसेनेकडून घोषणा

Ritu Tawade Mumbai Mayor: मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. भाजपकडून रितू तावडे आणि शीतल गंभीर यांच्या नावाची चर्चा होती, पण रितू तावडे यांनी बाजी मारली आहे. 

Ritu Tawade Mumbai Mayor: मुंबई मनपाच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडे (Ritu Tawade Mumbai mayor) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. मुंबईच्या उपमहापौरपदी शिंदेसेना शिंदे गटाकडून संजय शंकर घाडी (Sanjay Ghadi) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पुढील सव्वा वर्षांसाठी घाडी उपमहापौर असणार आहेत. भाजपकडून रितू तावडे आणि शीतल गंभीर यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती, पण रितू तावडे यांनी बाजी मारली. मुंबईचे महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे. 11 फेब्रुवारी मुंबई मनपा महापौर निवड होणार आहे. रितू तावडे या भाजपच्या मुंबईमधील पहिल्या महिला महापौर असणार आहेत. 

नावाची घोषणा होताच रितू तावडे काय म्हणाल्या?

मुंबईची महापौरपदी निवड झाली असली तरी मुंबईची सेवक म्हणून काम करणार आहे. महापौरपद कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वांना होती. मुंबईच्या हितासाठी सर्व नगरसेक निवडून गेले आहेत. सभागृहाची गरिमा ठेवून मुंबईच्या हितासाठी पक्षभेद विसरुन निर्मळ आणि प्रामाणिक काम करावं अशी माझी अपेक्षा आहे, असं मुंबईच्या नव्या महापौरपदाच्या उमेदवार रितू तावडे म्हणाल्या.

कोण आहेत रितू तावडे? (Who Is Ritu Tawade)

  • रितू तावडे या भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आहेत. 
  • 2012 मध्ये प्रभाग क्रमांक 127 मधून विजय मिळवला होता.
  • 2017 मध्ये घाटकोपरमध्ये प्रभाग क्रमांक 121 मधून पहिल्यांदा निवडून आल्या होत्या. 
  • यानंतर 2025 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 132 मधून विजय मिळवला आहे.
  • त्यांनी मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. 
  • त्या महापौर पदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या.

उपमहापौरपदी संजय घाडींच्या नावाची घोषणा 

दुसरीकडे, मुंबई मनपामध्ये शिवसेना शिंदे गटाचा उपमहापौर असणार आहे. शिंदे गटाकडून संजय घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. दरम्यान, शिंदे गटाकडून मुंबईत सुद्धा पदांची खांडोळी पायंडा कायम ठेवला आहे. संजय घाडी यांना सव्वा वर्षांचा कार्यकाळ असेल, अशी घोषणा शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी केली. 

कोण आहेत संजय घाडी?

संजय घाडी 1988-89 पासुन शिवसेना प्रणित भारतीय विद्यार्थी सेनेचा विभाग प्रमुख, सन 1990-91 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंड कौन्सिलचे अध्यक्ष व सिनेट सदस्य, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्य सरचिटणीस, शिवसेना उपनेते व सध्या शिवसेनेचा रायगड जिल्हा संपर्कप्रमुख आहेत. सन 2017 ते 2022 शिवसेना नगरसेवक होते. त्यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. त्यांच्या पत्नी संजना घाडी शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आहेत. मुलगा सुयश युवासेना विधानसभा समन्वयक आहे. 

शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार दिला जाणार?

गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून कोणाला संधी दिली जाणार? याची चर्चा रंगली होती. भाजपचा उमेदवार मराठी असणार की अमराठी असणार?? अशीही चर्चा रंगली होती. मात्र, आता भाजपनेे ठाकरेंना कोणतीही संधी न देता रितू तावडे या मराठी उमेदवाराला संधी दिली आहे. रितू तावडे या गुजरातीबहुल घाटकोपरमधील आहेत. आता भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवार देण्यात आल्याने ठाकरे गटाकडूनही उमेदवार दिले जाणार का? याची उत्सुकता आहे. या संदर्भात आज ठाकरे गटाची बैठक होणार आहे. या बैठकीत महापौर निवडणुकीसाठी उमेदवार द्यायचा की नाही याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.  

मुंबई महापालिकेचा अंतिम निकाल-(BMC Election Result 2026)

भाजप - 89
शिवसेना ठाकरे गट - 65
शिवसेना - 29
काँग्रेस - 24 
मनसे - 6 
एमआयएम- 8 
एनसीपी - 3 
एसपी - 2 
एनसीपी शप - 1 

इतर महत्वाच्या बातम्या

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश, सकाळच्या सत्रात वाजणार घंटा
उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश, सकाळच्या सत्रात वाजणार घंटा
पंतप्रधान बारकाईने लक्ष ठेऊन, कुणीही अफवा पसरवू नका; गॅस पुरवठ्यावर DCM एकनाथ शिंदेंकडून स्पष्टीकरण
पंतप्रधान बारकाईने लक्ष ठेऊन, कुणीही अफवा पसरवू नका; गॅस पुरवठ्यावर DCM एकनाथ शिंदेंकडून स्पष्टीकरण
एसटीच्या जागांचा पीपीपी तत्त्वावर विकास; प्रवाशांना आधुनिक सुविधा व स्थानिकांना रोजगार मिळणार, प्रताप सरनाईकांची माहिती
एसटीच्या जागांचा पीपीपी तत्त्वावर विकास; प्रवाशांना आधुनिक सुविधा व स्थानिकांना रोजगार मिळणार, प्रताप सरनाईकांची माहिती
Live Blog Updates: तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आज निघणार मोर्चा, अमित ठाकरेही सहभागी होणार
Live Blog Updates: तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आज निघणार मोर्चा, अमित ठाकरेही सहभागी होणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
Ashneer Grover On LPG: 'टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे! विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाही' अशनीश ग्रोव्हरची देशातील इंधन टंचाईवर खोचक टिप्पणी
'टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे! विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाही' अशनीश ग्रोव्हरची देशातील इंधन टंचाईवर खोचक टिप्पणी
OBC Reservation : फक्त पालकांच्या उत्पन्नावरून OBC क्रीमी लेयर ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
फक्त पालकांच्या उत्पन्नावरून OBC क्रीमी लेयर ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
Iran War Live Update: सैन्याची बिनशर्त शरणागती सोडाच, इराणमध्ये नेतृत्व संपवून सत्तापालट सुद्धा शक्य नाही! ट्रम्प युद्ध गुंडाळण्याच्या तयारीत
सैन्याची बिनशर्त शरणागती सोडाच, इराणमध्ये नेतृत्व संपवून सत्तापालट सुद्धा शक्य नाही! ट्रम्प युद्ध गुंडाळण्याच्या तयारीत
Shivsena : शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? दोन्ही गट अंतिम युक्तिवादासाठी तयार, पण कोर्टाकडून पुन्हा पुढची तारीख
शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? दोन्ही गट अंतिम युक्तिवादासाठी तयार, पण कोर्टाकडून पुन्हा पुढची तारीख
उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश, सकाळच्या सत्रात वाजणार घंटा
उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश, सकाळच्या सत्रात वाजणार घंटा
सोलापुरात भाजपचा जल्लोष, 11 पैकी 10 पंचायत समितीवर सभापती; शहाजी बापूंच्या सांगोल्यात ऐनवेळी गेम पलटला
सोलापुरात भाजपचा जल्लोष, 11 पैकी 10 पंचायत समितीवर सभापती; शहाजी बापूंच्या सांगोल्यात ऐनवेळी गेम पलटला
Embed widget