Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतून छत्तीसगडच्या बस्तर सफारीवर निघालेल्या 24 वर्षीय तरुणीचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रिद्धी ठक्कर (Riddhi Thakkar) असे या तरुणीचे नाव असून तिचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रिद्धी ठक्कर मुंबईच्या बोरिवली पश्चिम येथील रहिवासी होती.
नेमकं काय घडलं? (Riddhi Thakkar Mumbai Biker Death)
रिद्धी ठक्करसोबत देशातील विविध भागातून 23 महिला बायकर्सचा ग्रुप एकत्र आला होता, या ग्रुपमध्ये 20 बाईक आणि एक गाडी होती. सर्वजण रायपूरहून बस्तरकडे जात होते. प्रवासाला निघण्यापूर्वी अवघ्या पंधरा तासापूर्वी रिद्धी ठक्करने इंस्टाग्रामवर आपली एक पोस्ट टाकली होती. मात्र काल सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जगतरा दरीतील वळणवर एका अज्ञात ट्रकने रिद्धीच्या बाईकला जोरदार धडक दिली. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला. मात्र गंभीर अवस्थेत रिद्धीला इतर सहकाऱ्यांच्या मदतीने तिला जवळचे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वी वैद्यकीय डॉक्टर यांनी रिद्धी ठक्करला मृत घोषित केले. (Riddhi Thakkar Mumbai Biker Death)
रिद्धीला बाइकिंग आणि लांब पल्ल्याच्या राइड्सची विशेष आवड- (Who Is Riddhi Thakkar Marathi News)
रिद्धी ठक्कर ही मुंबईतील 24 वर्षीय बाईकर होती. 12 ऑगस्ट 2026 रोजी छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील मार्काटोला घाटाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 30 वर तिच्या मोटरसायकलची ट्रेलर ट्रकला धडक झाली. या भीषण अपघातात रिद्धीचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, रिद्धी ही 22 महिला बायकर्सच्या ग्रुपसोबत बाइक राइडवर निघाली होती. या दुर्घटनेनंतर तिच्या सहकाऱ्यांमध्ये आणि कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे. रिद्धीला बाइकिंग आणि लांब पल्ल्याच्या राइड्सची विशेष आवड होती. रिद्धीला बाइकिंग आणि लांब पल्ल्याच्या राइडिंगची विशेष आवड होती. ती आपल्या प्रवासाशी संबंधित फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असे. तिच्या अचानक झालेल्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर बाईकिंग कम्युनिटीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याचे वृत्त आहे.
