ही नाणं फारच कमी कालावधीसाठी जारी केली जाणार आहेत. आरबीआयकडून अशाप्रकारची नाणी खास निमित्तासाठी जारी केली जातात.
350 रुपयांच्या नाण्याचं वैशिष्ट्य
चांदी, तांबे, निकेल आणि झिंक धातूमिश्रित 350 रुपयांचं हे नाणं 44 एमएमचं असेल. नाण्याच्या पुढच्या भागात अशोक स्तंभ असेल आणि त्याखाली सत्यमेव जयते लिहिलेलं असेल. त्याचबरोबर नाण्याच्या दोन्ही बाजूंना इंग्लिशमध्ये इंडिया आणि देवनागरीत भारत लिहिलेलं असेल. याच भागात रुपयाचं चिन्ह आणि मध्ये 350 मुद्रीत असेल. तसंच नाण्याच्या मागील भागावर इंग्लिश आणि देवनागरीत श्री गुरु गोविंद सिंह यांचा 350 वा प्रकाश उत्सव लिहिलेलं असेल. यावर 1666-2016 हे देखील मुद्रीत केलेलं असेल.
नाण्याचं वजन किती?
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिसूचनेनुसार, नाण्याचं वजन 34.65 पासून 35.35 ग्रामच्या दरम्यान असेल. बाजारात किती नाणी जारी केली जाणार ह्याची माहिती अद्याप दिलेली नाही.
नाण्यात कोणत्या धातूचं किती प्रमाण?
आरबीआयकडून जारी होणाऱ्या 350 रुपयांच्या नाण्यात चांदीचं प्रमाण 50 टक्के, तांबे 40 टक्के, निकेल पाच टक्के आणि झिंक पाच टक्के असेल.