मुंबई : योगगुरु रामदेव बाबा यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राजकारण आणि योग या विषयांवर चर्चा करण्यासाठी ही सदिच्छा भेट असल्याची माहिती राज ठाकरे यांच्या निकटवर्तियांनी दिली आहे.


आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी बाबा रामदेव दाखल झाले. आणि त्यानंतर सुमारे अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाली.

दरम्यान या भेटीमागे काही राजकीय कारण होतं का? याची माहिती मात्र अजूनही मिळालेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात राज ठाकरे आणि रामदेव बाबा यांच्या भेटीची चर्चा रंगली आहे.