मुंबई: देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात नुकतंच कॅबिनेटपदी प्रमोशन मिळालेल्या राम शिंदे यांनी अखेर आज जलसंधारण मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे यांच्यातील शीत युद्धाचा फटका आपल्याला बसू नये म्हणून आठ्वडाभर राम शिंदे हे पदभार स्वीकारण्यापासून अलिप्त राहिले होते अशी चर्चा होती. अखेर आज राम शिंदे यांनी पदभार स्वीकारला.


 

मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे दोघेही आज मुंबईत परतणार असल्याने त्यांच्याशी चर्चा करून आज पदभार स्वीकारल्याचं राम शिंदे यांनी मान्य केलं. पंकजा मुंडे यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्याचं ही त्यांनी सांगितलं.

 

मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे यांच्यातील शितयुद्धात आपला बळी न जावा यासाठी राम शिंदे यांनी सावध पवित्रा घेतल्याची चर्चा होती.

 

मंत्रिमंडळ विस्तारात राम शिंदे यांची गृहराज्य मंत्रीपदावरुन कॅबिनेटपदी वर्णी लागली. यावेळी त्यांना पंकजा मुंडेंकडून काढून घेण्यात आलेलं जलसंधारण खातं देण्यात आलं.