मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काढलेल्या आत्मक्लेश यात्रेत राजू शेट्टींचा यांचा मुलगा सौरभ शेट्टी याला चक्कर आली आहे. उष्णतेमुळे ही चक्कर आल्याची प्राथमिक माहिती आहे. सौरभला सध्या माटुंग्यातील फाईव्ह गार्डन मैदानामध्येच सलाईन लावण्यात आलं आहे.

राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा, मुंबईत वाहतूक कोंडी


राजू शेट्टी यांनी आज चेंबूरच्या शिवाजी पुतळ्याला अभिवादन केलं. त्यानंतर ते लालबागच्या दिशेने रवाना झाले आहेत. पण त्यांच्यासोबत असलेल्या समर्थकांमुळे मुंबईत येणाऱ्या वाहनांच्या मार्गात अडथळा निर्माण झाला होता. दरम्यान मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध करणारे शेतकरीही राजू शेट्टींच्या आत्मक्लेश यात्रेत सहभागी होणार आहेत.

आत्मक्लेश यात्रेत राजू शेट्टींच्या पायांना सूज आणि फोड!

पुण्यातून 22 मे रोजी खासदार राजू शेट्टींच्या आत्मक्लेश यात्रेला सुरुवात झाली. पुण्यातील फुले वाड्यात अभिवादन करुन आत्मक्लेश यात्रा मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती.

शेतकऱ्यांचा सात-बारा उतारा कोरा करा, कर्जमुक्ती द्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा इत्यादी मागण्या घेऊन खासदार राजू शेट्टी यांनी आत्मक्लेश यात्रेला सुरुवात केली आहे.

संबंधित बातम्या

खासदार राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा मुंबईत दाखल

शेतकऱ्यांकडून पाय धुवून घेण्याची भाजप नेत्यांची लायकी नाही : शेट्टी 


खासदार राजू शेट्टींचा मुलगा सौरभही राजभवनावर धडकणार 


आत्मक्लेश यात्रेत राजू शेट्टींच्या पायांना सूज आणि फोड!