Raj Thackeray and Uddhav Thackeray: काही दिवसांपूर्वी मराठी मेळाव्याच्यानिमित्ताने एकत्र आल्यानंतर ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे हे मातोश्रीवर पोहोचले आहेत. काहीवेळापूर्वीच राज ठाकरे हे दादरमधील आपल्या निवासस्थानावरुन मातोश्रीकडे रवाना झाल्याची माहिती समोर आली होती. राज ठाकरे हे मातोश्रीवर जाणे हा अनेक अर्थांनी ऐतिहासिक क्षण मानला जात आहे. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे हे काही निवडक प्रसंग सोडले तर ते मातोश्रीवर गेले नव्हते. शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे हे जेव्हा जेव्हा मातोश्रीवर गेले होते, तेव्हा काहीतरी अपरिहार्य कारण होते. मात्र, आता राज ठाकरे हे पहिल्यांदाच स्वखुशीने मातोश्रीवर पोहोचले आहेत. (Raj Thackeray and Uddhav Thackeray)
राज ठाकरे मातोक्षीवर पोहोचले, भावाच्या हातात हात दिला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पुष्पगुच्छ दिला हातात हात दिला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे अनेक नेते उपस्थित असल्याचं दिसून आले. यावेळी राज ठाकरेंच्या स्वागतासाठी सजंय राऊत पुढे गेले होते. राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू केला. मातोश्रीवर एकचा आवाज घुमल्याचं दिसून आलं. राज ठाकरेंच्या खाद्यांवर हात ठेवून आलिंगन दिलं. (Raj Thackeray and Uddhav Thackeray)
राज ठाकरे हे शिवसेनेत असताना अनेकदा मातोश्रीवर जायचे. राज ठाकरे हे लहानपणापासून बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिले होते. त्यांच्याच मुशीत राज ठाकरे यांची जडणघडण झाली होती. त्यामुळे राज ठाकरे हे अनेकदा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मातोश्रीवर असायचे. मात्र, शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे आणि मातोश्रीची ताटातूट झाली होती. मात्र, आता राज ठाकरे हे अनेक वर्षांनी मातोश्रीवर पाऊल ठेवणार आहेत. हा महाराष्ट्रातील राजकारणाच्या नव्या अध्यायाचा श्रीगणेशा ठरण्याची शक्यता आहे.
मराठी मेळाव्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मनसे-ठाकरे गटाच्या युतीच्यादृष्टीने कोणत्याही ठोस हालचाली झाल्या नव्हत्या. त्यामुळे ठाकरे बंधूंची युती बारगळणार का, असा प्रश्न विचारला जात होता. मात्र, राज ठाकरे आता मातोश्रीवर जाणार असल्याने ठाकरे गट-मनसे युतीच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. राज ठाकरे यांची मातोश्रीवर जाण्याची कृती अनेक अर्थांनी महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे.