रेल्वे रुळ ओलांडताना मुंबईत एकाच दिवसात 16 जणांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 03 Jun 2016 03:28 AM (IST)
मुंबई: काल मुंबई रेल्वेच्या विविध मार्गांवर एकाच दिवशी तब्बल 16 जणांना रुळ ओलांडताना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर या अपघातात 8 जण जखमी झाले आहेत. हा आठवडा भारतीय रेल्वेतर्फे 'हमसफर' सप्ताह म्हणून चालवला जातो आहे. त्यामुळे या आठवड्यातच झालेल्या अपघातांच्या या आकडेवारीने हमसफर सप्ताहावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. वेळ वाचवण्यासाठी अथवा गाडी पकडण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडण्याचा घातकी पर्याय अनेक जण स्वीकारत असल्याचं या आकडेवारीवरुन समोर आलं आहे. तर, २४ मे ते १ जून या अवघ्या नऊ दिवसांत रेल्वे अपघातांत तब्बल ९० जणांनी जीव गमावला आहे. मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गांवर अनेक ठिकाणी प्रवासी रुळ ओलांडतात. त्याबाबत वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केलं जाते.