डोंबिवली : डोंबिवलीच्या खोणी गावात जमावाच्या मारहाणीत एका माथेफिरुचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे तर बघ्याची भूमिका घेणाऱ्या दोन पोलिसांनाही निलंबित करण्यात आलं आहे.
खोणी गावात काही दिवसांपूर्वी हा माथेफिरु इसम आला होता. त्याने अचानक एका किराणा दुकानात घुसून तेथील सामान फेकून दिलं. यावेळी दुकानदार त्याला अडवण्यास गेला असता त्याच्याही बोटाला त्यानं चावा घेतला. इतक्यावरच न थांबता या माथेफिरुनं एक टेंम्पो पळवून नेण्याचा प्रयत्नही केला होता.
या सगळ्या प्रकाराने संतापलेल्या जमावानं त्याला धरून मारहाण केली. या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, माथेफिरुला मारहाण सुरु असताना मानपाडा पोलीस ठाण्याचे दोन पोलीस तिथे पोहोचले देखील. मात्र, जमावाचा आवेश पाहून त्यांनी या माथेफिरुला सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळेच त्या दोनही पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.
डोंबिवलीत जमावाच्या मारहाणीत माथेफिरु इसमाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Nov 2017 12:04 AM (IST)
डोंबिवलीच्या खोणी गावात जमावाच्या मारहाणीत एका माथेफिरुचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे तर बघ्याची भूमिका घेणाऱ्या दोन पोलिसांनाही निलंबित करण्यात आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -