निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन! मुंबई पोलिसांकडून आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबईच्या शिवाजी पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर आता मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यामध्ये सीजेपी, ठाकरेंची शिवसेना, मनसेच्या कार्यकर्त्यांसोबतच इतरही आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबईच्या शिवाजी पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईतील शिवसेना भवनसह शिवाजी पार्क परिसरात आज आंदोलन करण्यात आले
आज शिवाजी पार्कमध्ये सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लोकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केल्यावर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी निषेध केला आणि नंतर ते स्वतः आंदोलनात सामील झाले होते. यानंतर पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील शिवसेना भवनसह शिवाजी पार्क परिसरात आज आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा यासाठी नवी दिल्लीत सीजेपीचे आंदोलन सुरू
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा यासाठी नवी दिल्लीत सीजेपीचे आंदोलन सुरू आहे. त्या आधी तीन दिवस राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीने आंदोलन केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर रविवारी मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात सीजेपीने आंदोलनाची हाक दिली होती. सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी रविवारी सकाळपासूनच शिवाजी पार्क परिसरात तगडा बंदोबस्त ठेवला होता. त्या भागात जाणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी केली जात होती. अशातही आंदोलनासाठी जाणाऱ्या काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
सीजेपीला पाठिंबा देण्यासाठी युवा सेनेकडून आंदोलन करण्यात आलं
शिवसैनिक आणि मुंबई पोलिसांमध्ये जोरदार राडा झाल्याचं दिसून आलं. सीजेपीकडून मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये आंदोलानाची हाक देण्यात आली होती. मात्र, सीजेपीच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करण्यात सुरु केली होती. सीजेपीला पाठिंबा देण्यासाठी युवा सेनेकडून आंदोलन करण्यात येणार होतं. मात्र, पोलिसांनी शिवसेना भवनात घुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. यामुळं मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं.
Before You Go
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली




















