Continues below advertisement

मुंबई : प्रकाश महाजन यांनी शिवसेनेत प्रवेश करताच ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला. अंधारात एकटे जाण्यापेक्षा दोघे भाऊ एकत्र जाऊ अशी भूमिका त्यांनी घेतली आहेे, पण त्यांच्या नशिबी अंधार चुकणार नाही टीका प्रकाश महाजनांनी (Prakash Mahajan) केली. तसेच एकनाथ शिंदे हे रात्री कितीही वाजता भेटणारे नेते आहेत, बाकी लोक 'औषध' घेऊन लवकर झोपतात असा टोलाही त्यांनी राज ठाकरे यांना लगावला. प्रकाश महाजन यांनी नुकतीच मनसेची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

वीस वर्षांचा दुरावा 10 मिनिटात संपतो का? असा प्रश्न प्रकाश महाजन यांनी विचारला. दोन्ही बंधूंनी हिंदुत्व सोडले असून जागावाटप जाहीर होऊ द्या, त्यांच्याकडे कुणीच राहणार नाही अशी टीका प्रकाश महाजन यांनी केली.

Continues below advertisement

Prakash Mahajan News : कंबरेवर हात ठेऊन कुणी वारस होत नाही

शिंदे साहेबांनी त्यांच्या कामातून वारसा सिद्ध केला. कुणी कंबरेवर हात ठेऊन कुणाचा वारस होऊ शकत नाही असा टोला प्रकाश महाजन यांनी ठाकरेंना लगावला. यापुढे जर कुणी शिंदे साहेबांवर टीका केली तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

मुंबई-ठाणे आणि नाशिक या तीनच महापालिकेमध्ये यांचा इंटरेस्ट आहे. इतर ठिकाणी ठाकरे कुठेही लक्ष देत नाहीत अशी टीका प्रकाश महाजन यांनी केली. आम्हीही मराठी आहोत, मग हे कुठल्या मराठी माणसाचं बोलतात असा प्रश्नही त्यांनी विचारला.

Prakash Mahajan On Raj Uddhav Yuti : एकनाथ शिंदेंचा मोठेपणा

प्रकाश महाजन म्हणाले की, "मी अधिकृत रित्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मी याआधी शिवसेनेचा उपनेता होतो. शिंदे साहेबांचे वैशिष्ट्य आहे, ते या शिवसेनेचे प्रमुख असून देखील शिवसेनेचा नेता समजतात हा त्यांचा मोठेपणा मला खूप भावला. मी गुरुवारी रात्री त्यांना भेटलो, फार उत्साहाने ते मला भेटले. एक मराठी माणूस मराठी माणसाला रात्री बारा वाजता भेटतो फार बरं वाटलं. या प्रवेशाचं सर्व श्रेय मी जर कोणाला देवी इच्छितो ते मंगेश चिवटे यांना देईन. ते आरोग्य दूत जरी असले ते माझ्यासाठी राजदूत झाले आहे."

एकनाथ शिंदेंचे कौतुक करताना प्रकाश महाजन म्हणाले की, "माझी इच्छा हिंदुत्वावर काम करायची होती आणि शिंदेसाहेब हिंदुत्वाविषयी खूप जागरूक आहात. एकनाथ शिंदे हे खरोखरच हिंदुत्ववादी आहेत. मुख्यमंत्री पदाच्या काळात मला तुमचं खूप कौतुक वाटतं. जातीयवादाने महाराष्ट्र पेटला असताना शिंदेंनी त्यांच्या कुशल नेतृत्वाने परिस्थिती हाताळली. एखादं गाव अतिवृष्टीमध्ये वाहून जातं आणि रात्री दीड वाजता मुख्यमंत्री तिथे पोहोचतो. या महाराष्ट्रात असे काही मुख्यमंत्री झालेत की त्यांनी घर सोडलं नाही, जे परीक्षेला बसले नाहीत ते पहिले आलेत."