मुंबई : फेरीवाला प्रकरणाला मराठी-अमराठी चेहरा देणं राजकीय बदमाशी आहे, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे मनसेवर निशाणा साधला आहे. मुंबईतील एलफिन्स्टन घटनेनंतर मनसेने फेरीवाल्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मात्र फक्त अमराठी फेरीवाल्यांनाच लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप मनसेवर केला जात आहे.

एबीपी माझाच्या 'माझा व्हिजन, माझा महाराष्ट्र' या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांना मुंबईतील फेरीवाल्यांच्या समस्येवरही प्रश्न विचारण्यात आला. मात्र हे काम अगोदरपासूनच सुरु आहे. काम अधिक वेगाने सुरु करण्याचे आदेश दिले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

फेरीवाल्यांबाबत सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, त्याप्रमाणे धोरण तयार करुन त्याचे नियमही तयार करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेकडून त्याची अंमलबजावणी सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

फेरीवाला धोरण तयार करुन त्यांचे नियम बनवण्यात आले आहेत. त्यानुसार, बीएमसी शक्य त्यांना कायमस्वरुपी परवाना देईल आणि शक्य नाही त्यांना हटवणार आहे. अनधिकृत फेरीवाले हटवलेच पाहिजेत आणि कारवाई केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.