Police Officers Transfers News : राज्यातील पोलिस खात्यात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. IPS तेजस्वी सातपुते यांची पुण्याच्या गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तेजस्वी सातपुते सध्या खरात प्रकरणाचा तपास करत आहेत. खरात प्रकरणात स्थापन केलेल्या एसआयटी प्रमुख पदावर सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खरात प्रकरणातील एसआयटीचा तपास सातपुते यांच्याकडेच राहणार असल्याची माहिती मिळत आहे. 

मनोजकुमार शर्मा हे मुंबईचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे नवे सहपोलीस आयुक्त 

राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मनोजकुमार शर्मा हे मुंबईचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे नवे सहपोलीस आयुक्त असणार आहेत. तर अनिल कुंभारे मुंबई गुन्हे शाखेचे नवे सहपोलीस आयुक्त असणार आहेत. सुवेझ हक यांची मुंबई पोलिसांच्या प्रशासन विभागाच्या सहपोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबईच्या वाहतूक सहपोलीस आयुक्तपदी सत्यनारायण चौधरी यांची बदली  करण्यात आली आहे. त्याचबरोबर राजेश प्रधान मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे नवे सहपोलीस आयुक्त असणार आहेत. 

नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांचीही बदली

नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांची देखील बदली करण्यात आली आहे. आता प्रवीण पडवळ हे नाशिक परिक्षेत्राचे नवीन विशेष पोलीस महानिरीक्षक असणार आहेत. अशोक खरात प्रकरण आणि इगतपुरी कॉल सेंटरसह 400 कोटींचा कंटेनर दत्ता कराळे चर्चेत आले होते. अशोक खरात सोबत दत्ता कराळे यांचा एका कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल  झाला होता. अंजली दमानिया यांनीही याबाबतीत आरोप केले होते. दत्ता कराळे यांच्यांसाह राज्यातील इतर  वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदल्या करण्यात आल्या आहेत. काही दिवसापूर्वी नाशिक ग्रामीण चे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचीही बदली झाली होती. बाळासाहेब पाटील यांच्या पाठोपाठ आता दत्ता कराळे यांचीही बदली करण्यात आली आहे. 

राज्याच्या गृह विभागात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्य पोलीस खात्यातील वरिष्ठ स्तरावरच्या अधिकाऱ्यांसह IPS अधिकाऱ्यांच्यादेखील बदली करण्यात आल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Ashok Kharat Case : अशोक खरात महिलांचं शोषण कसं करत होता? SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी खरातचा शोषणाचा पॅटर्न सांगितला