चालत्या लोकलमध्ये पोलीस शिपायाची छातीत गोळी झाडून आत्महत्या
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 07 Aug 2016 04:41 AM (IST)
मुंबई : बोरिवली-चर्चगेट ट्रेनमध्ये पोलीस शिपायाने आत्महत्या केली आहे. मालाड ते गोरेगाव स्थानकांदरम्यान पोलीस शिपाई अमर गायकवाड यांनी स्वत:च्या रायफलने छातीत गोळी घालून जीवनयात्रा संपवली. बोरिवली चर्चगेट ट्रेनमध्ये लोकल पेट्रोलिंग ड्युटीवर असलेल्या अमर गायकवाड यांनी सेकंड क्लास डब्यात स्वत:वरच गोळी झाडली. त्यानंतर एएसआय धाडवे यांनी त्यांना उपचारासाठी जीटी हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, तपोर्यंत गायकवाड यांचा मृत्यू झाला होता. पोलीस शिपाई अमर गायकवाड यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.