मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्यात पहिलं राजकीय कनेक्शन उघड झालं आहे. पीएमसी बँकेचा रिकव्हरी बोर्डचा संचालक आणि भाजपचे माजी आमदार सरदार तारा सिंह यांचा मुलगा राजनीत सिंहला 16 नोव्हेंबरला अटक करण्यात आली आहे. पीएमसी बँक घोटाळ्यात ही नववी अटक आहे. राजनीत सिंहला तपास करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी त्याच्या घरी घेऊन आले आणि दोन तास घराची झडती घेतली. मात्र या तपासात काय निष्पन्न झाले यावर बोलण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. राजनीत सिंह गेल्या 19 वर्षांपासून रिकव्हरी कमिटी वर होता आणि 2008 पासून एचडीआयएलकडून त्यांना देण्यात आलेल्या लोनची रिकव्हरी करण्यात आलेली नाही. ज्याचा फटका सामन्यांच्या आयुष्यभराच्या कमाईवर बसला.
राजनीत सिंह हे सरदार तारा सिंह यांचे पुत्र असून सरदार तारा सिंह हे मुलुंड विधानसभेतून चार वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत तारा सिंह यांना उमेदवारी देण्यात आली नाही.
पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी आतापर्यंत 9 लोकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी राज ठाकरे यांनी हल्लाबोल करत ही बँक बुडण्यामागे भाजपाच्याच लोकांचा हात असल्याचा आरोप केला होता. राज ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार पहिलं राजकीय कनेक्शन राजनीत सिंग यांच्या रुपाने उघड झाले आहे. पीएमसी बँकेत घोटाळा झाला तेव्हा जयेश संघानी आणि केतन लकडावाला स्टॅट्युटरी ऑडिटर होते. या घोटाळयात बँकेचे बडे अधिकारी गुंतले आहेत. बँकेत झालेल्या अनियमितता झाकण्यामध्ये जयेश आणि केतन या दोघांनी महत्वाची भूमिका बजावल्याचा संशय आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. यामध्ये एचडीआयएल कंपनीचे प्रवर्तक आणि बँकेच्या बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
4,355 कोटी रुपयांचा हा घोटाळा समोर आल्यानंतर आरबीआयने पीएमसी बँकेवर निर्बंध आणले. ज्याचा फटका खातेदारांना बसला. आरबीआयने बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध आणले. ज्यामुळे खातेदारांमध्ये घबराट निर्माण झाली. काही खातेदारांनी आपली आयुष्यभराची कमाई बँकेत ठेवली होती. या तणावामुळे काही खातेदारांचा मृत्यू सुद्धा झाला.
पंजाब अँड महाराष्ट्र बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. त्यानंतर पीएमसी बँकेच्या खातेधारकांमधून रोष व्यक्त करण्यात येत आहे. कर्जवाटपात अनियमितता असल्यानं रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या प्रकरणी राज ठाकरे यांनी हल्लाबोल करत ही बँक बुडण्यामागे भाजपाच्याच लोकांचा हात असल्याचा आरोप केला होता.
या प्रकरणी आतापर्यंत या नऊ लोकांना अटक
1) राकेश वाधवान (कार्यकारी अध्यक्ष, HDIL GROUP)
2) सारंग वाधवान ( राकेश वाधवानचा मुलगा आणि HDIL चा उपाध्यक्ष आणि MD)
3) जॉय थॉमस ( माजी एमडी, PMC बँक)
4) वर्यम सिंह (HDIL चे माजी संचालक आणि PMC बँकेचे माजी अध्यक्ष)
5) सुरजित सिंह अरोरा ( संचालक PMC बँक)
6) जयेश संघांनी (ऑडिटर)
7) केतन लकडावाला (ऑडिटर)
8) अनिता किर्दत (ऑडिटर)
9) रजनीत सिंह (संचालक PMC बँक)
पीएमसी बँक घोटाळा | अटकेत असलेल्या राजनीत सिंहच्या घराची दोन तास झडती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Nov 2019 10:53 PM (IST)
राजनीत सिंह गेल्या 19 वर्षांपासून रिकव्हरी कमिटी वर होता आणि 2008 पासून एचडीआयएलकडून त्यांना देण्यात आलेल्या लोनची रिकव्हरी करण्यात आलेली नाही. ज्याचा फटका सामन्यांच्या आयुष्यभराच्या कमाईवर बसला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -