मुंबई:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉण्टी ऱ्होड्सच्या मुलीला वाढदिवसानिमित्त अनोख्या शुभेच्छा दिल्या.


जॉण्टी ऱ्होड्सच्या मुलीचं नाव इंडिया आहे. ती आता दोन वर्षांची झाली आहे. जॉण्टी ऱ्होड्सने मुलीच्या वाढदिवसानिमित्त एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला. त्याखाली हॅप्पी बर्थडे बेबी इंडिया अशा शुभेच्छा दिल्या.

https://twitter.com/JontyRhodes8/status/856016199712460800

हाच फोटो शेअर करत पंतप्रधान मोदींनी आपल्या स्टाईलमध्ये शुभेच्छा दिल्या. 'हॅप्पी बर्थडे टू इंडिया, फ्रॉम इंडिया' असं ट्विट मोदींनी केलं.

https://twitter.com/narendramodi/status/856195882869415936

थेट पंतप्रधानांनी ट्विट केल्यामुळे जॉण्टी ऱ्होड्स भारावून गेला. त्याने पंतप्रधानांना धन्यवाद दिले.

जॉण्टी ऱ्होड्स म्हणाला, "मोदीजी धन्यवाद, बेबी इंडियाला तिच्या जन्मभूमी (भारत) कडून खूप आशिर्वाद मिळाले"

https://twitter.com/JontyRhodes8/status/856345494896955397

23 एप्रिल 2015 रोजी मुंबई इंडियन्सचा फील्डिंग कोच आणि दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर जॉण्टी ऱ्होड्सला कन्यारत्न झालं. जॉण्टी ऱ्होड्स आणि त्याची गर्लफ्रेण्ड मेलानी जिनी यांनी आपल्या नवजात लेकीचं नामकरण इंडिया असं ठेवलं आहे.

मुंबईतील सांताक्रुझच्या सूर्या मदर अँड चाईल्ड इस्पितळात मेलानीनं इंडिया जिनीला जन्म दिला होता. विशेष म्हणजे, इंडियाचा जन्म वॉटरबर्थ प्रक्रियेद्वारा झाला होता.