एक्स्प्लोर

Ajit Pawar : सत्य कोण लपवतंय हे बाहेर आलं तर अनेकजण अडचणीत येतील; अजित पवारांचा घातपात, आणखी एका व्यक्तीचा संशय

Pinky Mali Father Allegations : अजित पवारांसोबत मृत पावलेल्या केबिन क्रू मेंबर पिंकी मालीच्या वडिलांनी विमान अपघाताची चौकशी करावी आणि सत्य समोर आणावं अशी मागणी केली आहे.

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनावर (Ajit Pawar Plane Crash) त्यांचे पुतणे रोहित पवारांनी (Rohit Pawar) घातपाताचा संशय व्यक्त केला आणि या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. त्यानंतर आता आणखी एका व्यक्तीने तसा संशय व्यक्त केला. अजित पवारांसोबत विमान अपघातात मृत पावलेल्या पिंकी मालीचे (Pinky Mali) वडील शिवकुमार माली यांनीही या अपघातावर संशय व्यक्त केला. राजकारण कोणत्याही थराला जाऊ शकतं, याप्रकरणाचं सत्य बाहेर आलं तर अनेकजण अडचणीत येतील असं मोठं वक्तव्य शिवकुमार माली यांनी केलं. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेला आता दोन आठवडे उलटून गेल्यानंतर रोहित पवारांनी यामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. रोहित पवारांनी त्यासंबंधी काही तथ्ये मांडले आणि या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.

नेमकं काय म्हणाले शिवकुमार माली? 

त्याचवेळी अजित पवारांसोबत केबिन क्रू म्हणून प्रवास करणाऱ्या आणि विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पिंकी मालीच्या वडिलांनी देखील घातपाताचा संशय उपस्थित केला. राजकारण कोणत्याही थराला जाऊ शकतं असं म्हणत त्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली. तसेच या प्रकरणातील सत्य बाहेर आलं तर अनेकजण अडचणीत येतील असा दावाही केला.

पिंकी मालीचे वडील शिवकुमार माली एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, "रोहित पवारांनी जी शंका व्यक्त केली ते पाहता हा घातपात असू शकतो असा संशय आम्हाला आहे. रोहित पवार आणि अमोल मिटकरींनी व्यक्त केलेल्या संशयावर तपास झाला पाहिजे. या अपघातात आम्हीही मुलगी गमावली आहे, त्यामुळे या अपघाताचं नेमकं कारण आम्हाला समजलं पाहिजे. जी व्हीएसआर कंपनी आहे, त्याचे अधिकारी आम्हाला याबद्दल काहीही माहिती देत नाहीत."

पिकी माली ही वरळीतील बीडीडी चाळ नं. 29 येथील रहिवाशी शिवकुमार माली यांची कन्या होती. व्हीएसआर कंपनीच्या विमानात ती फ्लाईट अटेंडन्ट म्हणून काम करत होती. 

डीजीसीएच्या अधिकाऱ्यांकडून विमानतळाची पाहणी

अजित पवारांच्या अपघातानंतर दोन आठवडे उलटून गेल्यानंतर प्रशासन जागं झालेलं पाहायला मिळालं.  DGCA च्या अधिकाऱ्यांनी येऊन बारामती विमानतळाची पाहणी केली. बारामती विमानतळावर विमान चालवण्याचं प्रशिक्षण देणाऱ्या दोन संस्था आहेत. अनेक ट्रेनी पायलट या ठिकाणी आहेत. त्यामुळे विमानतळाची पाहणी करत असल्याचं डीजीसीएकडून सांगण्यात आलं आहे.

अजित पवारांसमवेत विमानातील 5 जण मृत्यूमुखी

  • अजित पवार - उपमुख्यमंत्री
  • विदीप जाधव - अजित पवारांचे सुरक्षा रक्षक
  • पिंकी माळी - क्रू मेंबर
  • कॅप्टन सुमित कपूर - पायलट
  • कॅप्टन शांभवी पाठक - पायलट

ही बातमी वाचा:

About the author सचिन गाड

सचिन गाड, प्रतिनिधी, एबीपी माझा

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती
गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या

Embed widget