balasaheb Thackeray Memorial : बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेण्यात आल्याची माहिती मुंबई महानगरपालिका (BMC) आणि मुंबई पुरातन वास्तू संवर्धन समितीनं गुरूवारी हायकोर्टात दिली. तसेच महापौर बंगल्याच्या पुरातन वास्तूचं स्मारकात रुपांतर करताना सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याचा दावाही करण्यात आला आहे. (PIL related to balasaheb Thackeray Memorial at shivaji park)


दादरच्या शिवाजी पार्क (shivaji park) येथील महापौर बंगल्याच्या जागेवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb Thackeray Memorial at shivaji park) यांचं स्मारक उभारण्यात येत आहे. त्यासाठी राज्य सरकारनं एमआरटीपी कायद्यात आवश्यक ती दुरुस्ती केली आहे. परंतु हा निर्णय कायद्याला धरून नाही आणि सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court)  स्मारकांविषयी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांविरुद्ध आहे, असा दावा करून भगवानजी रयानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. महापौरांचा बंगला हा हेरिटेज वर्गवारीच्या दुसऱ्या टप्प्यात मोडतो आणि स्मारकाच्या बांधकामासाठी हेरिटेजच्या दृष्टीने सर्व आवश्यक ना हरकती देण्यात आल्याचा दावा समितीनं केला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर या स्मारकाला परवानगी नसल्याचा याचिकेत केलेला आरोप खरा नाही असा दावा पालिका आणि हेरिटेज समितीने प्रतिज्ञापत्रात केला आहे.


गुरावारी मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी पालिकेच्यावतीनं जेष्ठ वकील अनिल साखरे यांनी पालिका आणि मुंबई पुरातन वास्तू संवर्धन समितीच्यावतीनं प्रतिज्ञापत्र दाखल करून या स्मारकासाठी आवश्यक त्या परवानग्या घेण्यात आल्याचा दावा केला. राज्य सरकारने साल 2018 मध्ये महापौरांच्या बंगल्याचं बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्यास मंजुरी देत बंगल्याच्या जागेचं आरक्षण बदलून घेतलं. त्यासाठी आरक्षणातील बदल महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना कायद्यातील (एमआरटीपी) तरतुदींनुसार करण्यात आला आहे, असा दावा पालिकेनं आपल्या प्रतिज्ञापत्रातून केला आहे.


आणखी वाचा : 
Matoshree Special Report : राज्याच्या राजकारणात मातोश्रीचं महत्व काय? कसं झालं मातोश्रीचं मंदिर?
Balasaheb Thackeray : असं काय घडलं होतं की, बाळासाहेब ठाकरेंनी दोन वेळा दिला होता राजीनामा!
Shivsena First Rebel : शिवसेनेची स्थापना झाली अन् वर्षभरातच पहिलं बंड, काय आहे कहाणी?