Petrol and Diesel price hike: अवघ्या चार दिवसात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलच्या दरात हे 91 पैशांनी तर डिझेलच्या दर 94 पैशांनी वाढ करण्यात आली आहेत. त्यामुळे मुंबईतील पेट्रोलच्या (Petrol rate) दर थेट 107.49 तर डिझेलचा भाव (Diesel Rate) प्रति लिटर 94.02 रुपयांच्या घरात पोहोचला आहे. 15 तारखेला पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत तीन रुपयांनी वाढ करण्यात आली होती आणि आता अवघ्या चार दिवसांत पुन्हा एकदा दरवाढ करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वी 15 मे रोजी पेट्रोलच्या दरात 3 रुपये आणि डिझेलच्या दरात 3.11 रुपयांची घसघशीत वाढ करण्यात आली होती. त्याला चार दिवस उलटत नाही तोच आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Diesel rate) दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळपासून हे नवे दर लागू झाले आहेत. (Petrol and Diesel todays price) इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धामुळे (Iran America War) आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर कडाडले आहेत. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत होता. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपताच केंद्र सरकारने यापैकी काही भार सर्वसामान्यांवर टाकायचे ठरवले असून त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या भावात वाढ होताना दिसत आहे. अवघ्या चार दिवसांमध्ये दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. आगामी काळात खनिज तेलाचे दर वाढून पेट्रोलियम कंपन्यांचा तोटा कायम राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Maharashtra Petrol and Diesel rates: महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर किती?
MumbaiPetrol and Diesel rates
पेट्रोल- 107.49डिझेल- 94.02
Nagpur Petrol and Diesel rates
पेट्रोल 108.06डिझेल 94.63
Bhandara Petrol and Diesel rates
108.69 (पेट्रोल नवा दर)
95.24 (डिझेल नवा दर)
Pune Petrol and Diesel rates
Petrol- 107.86 (91 पैशांनी वाढ)
Disel - 94.40 (94पैशांनी वाढ )
Solapur Petrol and Diesel rates
पेट्रोल : 108.21डिझेल : 94.75
Nashik Petrol and Diesel rates
पेट्रोल : 108.84डिझेल : 95.35
Ratnagiri Petrol and Diesel rates
पेट्रोल - 109.53डिझेल - 96.06
Parbhani Petrol and Diesel rates
पेट्रोल:- १०९.४९ पैसे डिझेल:- ९५.९६ पैसे
Kolhapur Petrol and Diesel rates
पेट्रोल- 108.37डिझेल- 94.93
Washim Petrol and Diesel rates
डिझेल दर- 95.49पेट्रोल दर- 108.95
Amravati Petrol and Diesel rates
पेट्रोल - 109.15डिझेल - 95.68 Gondia Petrol and Diesel rates
पेट्रोल - 109.54डिझेल - 96.08
Sindhudurg Petrol and Diesel rates
पेट्रोल - 109.55डिझेल - 96.07
Raigad Petrol and Diesel rates
पेट्रोल - 108.82डिझेल - 95.30 Goa Petrol and Diesel rates
पेट्रोल - 101.25डिझेल - 92.99
आणखी वाचा
