मुंबई : पीटर मुखर्जी यांनी आपली पत्नी इंद्राणी मुखर्जी हिला परस्पर सहमतीने घटस्फोट देण्यास राजी असल्याचं कळवलं आहे. शीना मुखर्जी हत्याप्रकरणी पीटरही इंद्राणीसह सध्या जेलमध्ये असल्याने त्याने रजिस्टर्ड पोस्टाद्वारे इंद्राणीच्या वकिलांना घटस्फोटासाठी तयार असल्याचं कळवलं.
दरम्यान, दोघेही सध्या जेलमध्ये असल्याने घटस्फोटाच्या प्रक्रियेला वेळ लागणार आहे. या वर्षी एप्रिलमध्ये इंद्राणीने पीटरला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. आपल्या दोघांतील पती-पत्नीचं नातं पुन्हा कधीही जुळण्याच्या पलीकडे गेलं आहे, असं म्हणत इंद्राणीने पीटरला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती, ज्याला अखेरीस पीटरनेही होकार दिला.
एप्रिल 2012 मध्ये इंद्राणीची मुलगी शीना बोरा हिची निर्घृणपणे हत्या झाली होती. साल 2015 मध्ये या प्रकरणाचा खुलासा झाला. पीटर आणि इंद्राणीसह इंद्राणीचा पूर्व पती संजीव खन्ना यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयात खटला सुरु आहे.
पीटर मुखर्जी इंद्राणीला परस्पर सहमतीने घटस्फोट देण्यास तयार
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
18 Jun 2018 11:57 PM (IST)
शीना मुखर्जी हत्याप्रकरणी पीटरही इंद्राणीसह सध्या जेलमध्ये असल्याने त्याने रजिस्टर्ड पोस्टाद्वारे इंद्राणीच्या वकिलांना घटस्फोटासाठी तयार असल्याचं कळवलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -