ठाणे : भिवंडी रोड येथील टाटा आमंत्रा या क्वॉरंटाईन सेंटर मधून एक कोरोनाबधित रुग्णाने पाचव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मात्र, आत्महत्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. 17 जुलै रोजी डोंबिवली येथे राहणाऱ्या या रुग्णाला टाटा आमंत्रा येथे दाखल करून घेतले होते.
जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे महानगर पालिकेच्या भिवंडी रोड येथील टाटा आमंत्रा या कोविड रुग्णांसाठी असलेल्या कोविड सेंटर व क्वॉरंटाईन सेंटर मधून एक कोरोनाबधित रुग्णाने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 9 व्या मजल्यावरील रूम नंबर 917 मध्ये हा रुग्ण उपचार घेत होता. मात्र, या ठिकाणी येऊन त्याला 2 दिवसच झाले होते. त्याने दुपारच्या सुमारास पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करता शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
इलेक्ट्रिक वायरच्या सहाय्याने गळफास
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचा हा रुग्ण डोंबिवलीतील राधेश्याम सोसायटीत राहत असून त्याला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे 17 जुलै रोजी याला टाटा आमंत्रा कोविड व क्वॉरंटाईन सेंटरमध्ये आणून त्याच्यावर उपचार सुरू होता. मात्र, आज सकाळच्या सुमारास या व्यक्तीने आपल्या नव्या मजल्यावरील रूममध्ये दरवाजा बंद करून इलेक्ट्रिक वायरच्या सहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तेथील वॉर्डबॉयने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.
अवाजवी बीले आकारणी प्रकरणात 37 खाजगी रुग्णालयांना मुंबई महापालिकेचा दणका
त्यावेळी दरवाजा उघडत नसल्याने शंका आल्याने दरवाजा तोडून या रुग्णाला बाहेर काढण्यात आलं होतं. मात्र, या रुग्णाने असं का केलं यासाठी डॉक्टरांकडे उपचारासाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, त्याठिकाणी देखील या व्यक्तीने धक्काबुक्की करत थेट पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. यादरम्यान त्यांनी त्याचा मोबाईल देखील बाहेर फेकला. परंतु, या रुग्णाने आत्महत्या का केली याचे कारण मात्र अस्पष्ट आहे. या प्रकरणी कोनगावं पोलीस ठाण्याला माहिती दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या रुग्णाने आत्महत्या का केली? याचा शोध कोनगावं पोलिसांनी सुरू केला आहे.
Kalyan Dombivali Lockdown | कल्याण-डोंबिवलीत लॉकडाऊनमध्ये शिथिलता, हॉटस्पॉट क्षेत्रात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन