Opposition Parties Mumbai Meeting : देशातील 26 राजकीय पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेल्या इंडिया आघाडीची पुढील बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीचं आयोजन महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याकडून केलं जाणार आहे. त्यासाठी चाचपणी सुरु झाली असून यासंदर्भात शुक्रवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. मुंबईत होणारी 'इंडिची' बैठक सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता, नाना पटोले यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर वर्तवली आहे. 25 आणि 26 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये बैठक होणार होती, पण काही नेत्यांना या दिवशी वेळ नसल्यामुळे ही बैठक आता सप्टेंबरमध्ये होणार आहे. 


पाटणा (Patna) आणि बंगळुरूनंतर (Bengaluru) विरोधी आघाडीची ही तिसरी बैठक आहे, ज्यामध्ये संयोजकांव्यतिरिक्त अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP) आव्हान देण्यासाठी 26 पक्षांनी मिळून इंडियाची स्थापना केली आहे. मुंबई होणाऱ्या 'इंडिया'च्या बैठकीसाठी शरद पवारांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची चर्चा झाली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान आणि शशिकांत शिंदे, रोहित पवार आणि सुनिल भुसारा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी या बैठकीला ऑनलाईन उपस्थिती दर्शवली होती यशवंतराव चव्हाण सेंटर येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली.






या बैठकीनंतर नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात इंडिया बैठकी संदर्भात नियोजना बद्दल चर्चा केली. 
व्यवस्थित नियोजन कसं करता येईल, याविषयी शरद पवार यांनी केलं. उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा झाली. पुढील शनिवारी अकरा वाजता बैठक घेण्यात येणार आहे. 
लोकसभा जागांबाबत सध्या होमवर्क सुरु आहे. शिवसेनेशी आज  फोनवर या संदर्भात चर्चा झाली. बंगळुरुला इंडियाची बैठक झाली तेव्हा सर्व नेते सहभागी झाले होते, ते आपण पाहीले. आम्ही ताकदतीने लढणार आहोत, असे नाना पटोले म्हणाले. 



विरोधकांच्या बैठकीत कोणते नेते सहभागी झाले ?


या बैठकीला काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (यू)चे नेते नितीशकुमार उपस्थित होते. कुमार, द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिनही उपस्थित होते.


RJD प्रमुख लालू प्रसाद यादव, शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि काही इतर नेतेही या बैठकीला नेते उपस्थित होते.