मुंबई : 5 ऑक्टोबरची डेडलाईन सरली तरी मुंबईतले खड्डे बुजवण्यात पालिका प्रशासन पुन्हा अपयशी ठरलं आहे. हास्यास्पद बाब म्हणजे मुंबईत फक्त 35 खड्डे असल्याचा पुनरुच्चार पालिकेचे अतिरिक्त आयुक्त ए. कुंदन यांनी केला आहे.
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत खड्डयांच्या मुद्यावरुन सर्वपक्षीयांनी प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार टीका केली. गेल्या आठवड्यात स्थायी समितीच्या बैठकीत खड्ड्यांच्या मुद्यावरुन भाजपसह सर्वपक्षीयांनी सभात्याग केला होता.
त्यावेळी प्रशासनानं 5 ऑक्टोबरची डेडलाईन दिली होती. दरम्यान गेल्या आठवड्यात जे जे पुलाजवळ खड्ड्यामुळे रिजवान खान नावाच्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता.