नवी मुंबई : बोगस ऑनलाईन स्कीमद्वारे ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. कळंबोलीतील एका हॉटेलमध्ये छापा टाकून पोलिसांनी एकूण 17 आरोपींना अटक केली आहे.
एक जिओ इंडिया डॉट कॉम ऑनलाईन वेबसाईट चालवणारी टोळी ग्राहकांना लवकर करोडपती होण्याची स्वप्ने दाखवून, त्यांना वेगवेगळ्या स्कीममध्ये पैसे गुंतवणूक करण्यास सांगून ग्राहकांची मोठी लुबाडणूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी 19 ऑगस्ट 2017 रोजी संध्याकाळी कळंबोली येथील हॉटेल 'देवांशी इन' मध्ये छापा टाकला. यावेळी पोलिसांनी हॉटेलमधून एकूण 17 आरोपींना अटक केली आहे.
ही टोळी 'जिओ इंडिया डॉट कॉम' या कन्सेप्टमध्ये ग्राहकांना पैसे डबल करून लवकर करोडपती होण्याचे आमिष दाखवून त्यांना 10 हजार, 25 हजार, 50 हजार व एक लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्यास सांगत असत. या टोळीने 100 ग्राहकांची फसवणूक केली असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या टोळीने आणखी किती ग्राहकांची फसवणूक केली आहे याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
पैसे डबल करण्याचं आमिष दाखवणारी नवी मुंबईतील टोळी गजाआड
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई
Updated at:
21 Aug 2017 08:53 PM (IST)
ग्राहकांना पैसे डबल करून लवकर करोडपती होण्याचे आमिष दाखवून त्यांना एक लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्यास सांगणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -