Mumbai Bandra Worli Sea Link मुंबई: मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवरुन एका व्यक्तीने उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्येचं कारण अजूनही समोर आलेलं नाही. याबाबत पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.
मुंबई पोलिसांनी सदर घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, गुरुवारी रात्री 1 वाजताच्या आसपास वरळी सी लिंकवरुन एका व्यक्तीने उडी मारली असून घटनास्थळी मदतीसाठी पोलिसांनी तात्काळ यावे, अशी माहिती आम्हाला मिळाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सी लिंकवरील पोल क्रमांक 83 आणि 84 जवळ पोहचले.
सदर ठिकाणी पोहोचल्यावर एका व्यक्तीने तेथे कार (एमएच 43 बीएक्स 7670) उभी करून कारमधून खाली उतरून सी लिंकवरून समुद्रात उडी मारल्याची माहिती मिळाली. वरळी पोलिसांनी तात्काळ वरळी आणि वांद्रे अग्निशमन दलाला पाचारण केले, त्यांनी बॅटरीच्या सहाय्याने समुद्रात सदर व्यक्तीचा शोध घेतला, मात्र रात्रीचा अंधार आणि समुद्रातील उंच लाटांमुळे त्याचा शोध लागला नाही.
सकाळी साडेसात वाजता वरळी पोलीस ठाण्याला दादर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उडी मारलेल्या व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पुढील कारवाईसाठी तो नायर रुग्णालयात पाठवण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांना कळले की उडी मारलेल्या व्यक्तीचे नाव अल्ताफ मोहम्मद हुसेन असून तो मुंबईतील गोवंडी येथे आपल्या नातेवाईकांसोबत राहत होता. एका अधिकाऱ्याने सांगितले की, मृताच्या कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे, मात्र आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
13 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू-
मुंबईच्या बोरीवली पूर्वेत डंपरच्या चाकाखाली जाऊन 13 वर्षीय शाळेकरी मुलाच्या दुर्दैवी मृत्यू झालाय. बोरिवली पूर्वेत रोड नंबर तीन वर 13 वर्षीय शाळकरी मुलगा आपल्या बहिणीसोबत दुपारी शाळेत जात असताना भरधाव वेगाने जात असलेल्या डंपरने त्याला उडवले. मुलगा डंपरच्या चाकाखाली गेल्यामुळे मुलाचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला. सत्येंद्र कनोजिया वय 13 वर्ष असा शाळकरी मुलाचा नाव आहे. घटनेची माहिती मिळतात कस्तुरबा मार्ग पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन मुलाचा बॉडी पोस्टमार्टमसाठी शताब्दी रुग्णालयामध्ये पाठवले आहे. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी डंपर चालकाचे विरोधात गुन्हा दाखल करू अधिक तपास करत आहे.
संबंधित बातमी:
तीन शाळकरी मुलांना विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न, नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील खळबळजनक घटना