Shiv Jayanti 2022 : छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारी रोजी तारखेनुसार जयंती आहे.  शिवजयंतीला (Shiv Jayanti) काही तास शिल्लक राहिले असून महाराजांच्या जन्मदिनाची (Shiv Jayanti 2022) राज्यभरातील शिवभक्त (ShivBhakt) आतुरतेने वाट पाहत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला बेस्ट प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. शनिवारी शिवजयंतीला बेस्ट कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बेस्टने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे शनिवारी घराबाहेर पडताना बेस्टचं वेळापत्रक पाहायला विसरु नका.


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बेस्टच्या कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, सुट्टीच्या वेळापत्रकाप्रमाणे मुंबईतील बेस्टच्या बसेस धावतील, असे ट्विट BEST Bus Transport कडून करण्यात आले आहे. त्यामुळे शनिवारी तुम्ही कुठे बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर उद्या बेस्ट बसेस मर्यादीत धावणार आहेत. बेस्टच्या वेळापत्रकानुसारच आपला बाहेर जाण्याचा प्लॅन करा..




छत्रपती शिवाजी महाराजांची 392 वी शिवजयंती - 
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इंग्रजी कॅलेंडरनुसार 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुण्याच्या शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. त्यामुळे यंदाची ही महाराजांची 392 वी शिवजयंती असणार आहे. मागील दोन वर्ष कोरोनाचा प्रभाव असल्याने शिवजयंती निर्बंधाखाली होती. पण यंदा रुग्णसंख्या काहीशी आटोक्यात असल्याने शिवजयंती काही प्रमाणात नक्कीच साजरी होईल. त्यामुळे सर्व शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. 


हे ही वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha