मुंबई : श्रीमंतीचं प्रतिक आणि आलिशान असलेली बीएमडब्लू कार आता मुंबईकरांचा प्रवास सुखकर करणार आहे. बीएमडब्लू कार आता टॅक्सीच्या रुपात मुंबईच्या रस्त्यांवर धावाताना दिसणार आहे.


'बीएमडब्लू' आणि 'ओला'ने एकत्रित येऊन यासंदर्भात घोषणा केली आहे. 22 रुपये किलोमीटर दरानं ही गाडी ओलाच्या अॅपवर उपलब्ध होणार आहे.

लाखो रुपयांची बीएमडब्लू कार खरं तर सामान्यांसाठी स्वप्न पण आता तुम्ही सुध्दा तिच्यातून फिरण्याचा आनंद घेऊ शकता. मुंबई, दिल्ली आणि बंगळुरुमध्ये ओला ही सेवा सुरु करणार आहे.

त्यासाठी पुढील सहा महिन्यात एक हजार गाड्या रस्त्यावर उतरवल्या जातील. बीएमडब्लू गाडी विकत घेऊन टॅक्सीसाठी वापरणाऱ्यांसाठी खास सुविधा उपब्ध करुन दिली आहे.