मुंबई : मुंबईतील सात पैकी सहा नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्यानंतर आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता आणखी नुकसान होऊ नये यासाठी थेट कामाला सुरुवात केली आहे.


मुंबईतील राजकीय घडामोडीनंतर राज ठाकरे आता राज्यातील इतर ठिकाणच्या नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे पुणे, नाशिक, कल्याण-डोंबिवलीमधील नगरसेवकांशी तिथं जाऊन संवाद साधणार आहेत.

कल्याणमध्ये मनसेचे नऊ, नाशिकमध्ये पाच तर पुण्यात दोन नगरसेवक आहेत. शिवसेनेच्या मास्टरस्ट्रोकनंतर इतर ठिकाणीही असे प्रकार घडता कामा नये यासाठी आता राज ठाकरे स्वत: नगरसेवकांची भेट घेऊन त्यांच्या काही समस्या आहेत का ते जाणून घेणार आहेत. याचसोबत त्या शहरांमधील पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते यांच्याशीही संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहेत.

दरम्यान दुसरीकडे मनसेच्या 6 नगरसेवकांना वेगळा गट काढण्याची परवानगी देऊ नये म्हणून मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश अभ्यंकर यांनी कोकण आयुक्तांच्या कार्यालयात निवेदन दिलं आहे.

शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक, मनसेचे सहा नगरसेवक सेनेसोबत

‘मुंबई महापालिकेत लवकरच आमचा महापौर बसवू’ अशी बतावणी करणाऱ्या भाजपला शिवसेनेनं एक जोरदार धक्का दिला आहे. मुंबई महापालिकेतील मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक हे शिवसेनेसोबत जाणार आहेत.

हे सहाही नगरसेवक कोकण आयुक्त कार्यालयाकडे रवाना झाले असून ते आता वेगळ्या गटाची नोंदणी करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचं महापालिकेतील संख्याबळही वाढणार आहे. शिवसेनेच्या या खेळीनं एकाच वेळी भाजप आणि मनसेला जबरदस्त धक्का बसला आहे.

काल (गुरुवार) भांडुप पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या पराभवानंतर भाजप बरीच आक्रमक झाली होती. ‘लवकरच मुंबईत आमचा महापौर बसवू.’ असं वक्तव्य भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले होतं. भाजपच्या संभाव्य खेळी लक्षात घेऊन शिवसेनेनं तात्काळ एक भन्नाट चाल खेळत मनसेच्या तब्बल 6 नगरसेवकांना फोडलं. या सर्व घडामोडीत शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

पोटनिवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेनं तात्काळ परिस्थितीचा आढावा घेतला आणि काल रात्रीच बंद दाराआड सर्व चर्चांना सुरुवात झाली. शिवसेनेनं ही खेळी एवढ्या शांतपणे खेळली की, मनसे आणि भाजपला याचा थांगपत्ताही लागला नाही.

संंबंधित बातम्या :

शिवसेनेचं नीच राजकारण, उद्धवची खेळी कधीच विसरणार नाही : राज ठाकरे

चोरून फक्त छक्के घेऊन गेले, मनसेची पोस्टरबाजी

माफियांच्या पैशांवर शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी : किरीट सोमय्या

घोडेबाजारी केल्याचा आरोप गाढवांनी करु नये : उद्धव ठाकरे

पूर्वाश्रमीचे शिवसैनिक पुन्हा शिवसेनेत : अनिल परब

7 नगरसेवक, 13 आमदार ते मनसेकडे उरलेला एकटा नगरसेवक

पहिल्या मास्टरस्ट्रोकनंतर शिवसेनेची तात्काळ दुसरी खेळी!

शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक, मनसेचे सहा नगरसेवक सेनेसोबत

मनसेची साथ न सोडणारा एकमेव नगरसेवक कोण?

मॉकड्रीलचं कारण देत मुंबई महापालिकेच सर्व दरवाजे बंद!

करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप

दगाफटका योग्य नाही, नगरसेवकांवर राज ठाकरे भडकले

करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप